पापुआ न्यू गिनी बेटावर भूकंपाचे धक्के 

पीटीआय
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

सिडनी (पीटीआय) : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावरील विनाशकारी भूकंप ताजा असताना आज पापुआ न्यू गिनीच्या न्यू ब्रिटेन बेटावर आणि इंडोनेशियाच्या बाली बेटावर भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पापुआतील भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्‍टर स्केल इतकी होती. यापूर्वी 5.7 आणि 5.9 रिश्‍टर स्केलच्या तीव्रतेचे धक्के बसले आहेत. आतापर्यंत कोणत्याही वित्त किंवा जीवित हानीचे वृत्त नाही, मात्र सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी इंडोनेशियाच्या बाली बेटावर सुनामीचा कोणताही इशारा दिलेला नाही. बाली येथे 6.0 रिश्‍टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. 

पापुआ न्यू गिनीतील भूकंपानंतर सुनामी इशारा केंद्राने काही किनाऱ्यांवर सुनामीच्या लाटा येण्याची शक्‍यता वर्तविली आहे. पीएनजी आणि सोलोमन बेटाच्या किनाऱ्यावर 0.3 मीटर (एक फूट)पेक्षा कमी सुनामीच्या लाटा येतील, असे म्हटले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाने कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नाही, मात्र अशा प्रकारच्या बातम्या काही तासांनंतर येतात, असे नमूद केले आहे. अमेरिकी जिओलॉजिकल सर्व्हेच्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू हा न्यू ब्रिटन बेटाच्या किंबे शहरापासून 125 किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे होता. भूकंपाची खोली जमीनपासून सुमारे 40 किलोमीटर होती. बाली बेटावर भूकंपाचे हादरे होताच नागरिक घराबाहेर पळाले. मात्र, सुनामीचा इशारा नसल्याने नागरिक पुन्हा घरी परतले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake hits Papua New Guinea