न्यू कॅलेडोनियाला भूकंपाचे हादरे

पीटीआय
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नौमेआ : प्रशांत महासागरातील न्यू कॅलेडोनियाला बुधवारी भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 7.5 एवढी नोंदविण्यात आली. या भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर मोठ्या सुनामीचा इशारा देण्यात आला होता. तसेच, किनारी भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, कमी आकाराच्या सुनामीच्या लाटा निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. या भूकंपामुळे जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. 

न्यू कॅलेडोनियाच्या लॉयल्टी बेटांपासून 170 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीच्या खाली 10 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. भूकंपाच्या मोठ्या धक्‍क्‍यानंतर सुमारे 20 लहान मोठे धक्के जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. प्रशांत महासागरातील सुनामी इशारा केंद्राकडून सुनामीच्या मोठ्या लाटा निर्माण होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, कमी उंचीच्या सुनामीच्या लाटा किनाऱ्याला धडकल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सुनामीच्या लाटांमुळे नुकसान झाले नाही, असे सरकारी प्रवक्‍त्याने स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake holes in New Caledonia