
Earthquake in Delhi-NCR: अखेर 'ती' भविष्यवाणी ठरली खरी! तुर्की-सीरियानंतर दिल्लीतही भूकंप
नवी दिल्ली : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपाबरोबरच दिल्लीतही भूकंप होईल ही एका डच संशोधकाची भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. कारण दिल्लीसह परिसरात काल भूकंपाचे मोठे झटके अनुभवायला मिळाले, यामुळं दिल्लीकरांमध्ये मोठी घबराट पसरली होती. (Earthquake in Delhi NCR after Turkey Syria Frank Hoogerbeets prediction came true)
फ्रँक होगरबीट्स असं या संशोधकाचं नाव आहे. तुर्की आणि सीरियाबाबत भीषण भूकंपाची भविष्यवाणी त्यांनी केली होती. भूकंप होईपर्यंत या भविष्यवाणीला गांभीर्यानं घेण्यात आलं नव्हतं. पण नंतर होगरबीट्सच्या या भविष्यवाणीचीच चर्चा सुरु झाली होती. तुर्की आणि सीरियाच्या भूकंपानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतातही मोठ्या भूकंपाची भविष्यवाणीही करण्यात आली होती. पण आता हे खरंच ठरलं, कारण यामध्ये नेमकेपणानं भूकंपाची माहिती देण्यात आली होती.
पण आता हा प्रश्न उपस्थित होतोय की, तुर्की आणि सीरियानंतर आता भारतातही भूकंपाचे मोठे झटके जाणणार का? कारण मंगळवारी रात्री दिल्लीसह उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, भोपाळ तसेच श्रीनगर अशा अनेक राज्यांत जाणवले. यामुळं काल रात्री बराच काळ लोक भीतीच्या छायेत होते. इतकंच नव्हे तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात देखील असे झटके जाणवले. कारण भूकंपाच केंद्र अफगाणिस्तानातील फैजाबाद हे होतं. हा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा होता.
हे ही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
कोण आहे भविष्यवाणी करणारे फ्रँक होगरबीट्स?
डच संशोधक फ्रँक होगरबीट्स यांनी ही भविष्यवाणी केली होती. एका व्हिडिओच्या माध्यामातून होगरबिट्स यांनी ही भविष्यवाणी केल्याचं दिसून आलं होतं. त्यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटलं होतं की, "यापुढे भूकंपाचे झटके अफगाणिस्तानातून सुरु होऊन पुढे पाकिस्तान, भारतानंतर हिंदी महासागरापर्यंत जाणवतील. होगरबीट्स हे नेदरलँडचे रहिवाशी असून सोशल सिस्टिम जॉमेट्री सर्वेअर म्हणून काम करतात. होगरबीट्स हे स्वतःला भूकंपाचे संशोधक मानतात. अवकाशातील घटनांच्या अभ्यासातून त्यांनी ही भविष्यवाणी केली होती.
फ्रँक होगरबिट्स यांनी जेव्हा जेव्हा भूकंपाची भविष्यवाणी केली तेव्हा भूकंप आला आहे. २०१९ मध्ये असाम आणि अरुणाचल प्रदेशात आलेल्या भूकंपाच्या झटक्यानं हादरले होते, याची भविष्यवाणीही त्यांनी केली होती. नंतर ८-११ जुलैदरम्यान इराक आणि इराण बॉर्डरवर भूकंपाचा इशारा त्यांनी दिला होता. कॅलिफोर्नियासह जपान आणि नेपाळच्या भूकंपाबाबतही त्यांनी सांगितलं होतं.