esakal | पाकिस्तानला मोठ्या भूकंपाचा हादरा; 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

भूकंप

पाकिस्तानला मोठ्या भूकंपाचा हादरा; 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पाकिस्तानमधील हरनई परिसर गुरुवारी पहाटे भूंकपाच्या धक्क्यांनी हादरला. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी भूंकपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 6 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हरनईपासून 14 किमी दूर असल्याचा दावा एएफपीनं केला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या भूकंपामध्ये आतापर्यंत 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 150 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृताची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याशिवाय घरा-दारांचेही प्रचंड नुकासन झालेय.

भूकंपाची तीव्रता इतकी होती की हरनईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही हादरे बसले असून नुकसानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिक साखरझोपेत असतानाच भूकंपाचे तीव्र हादरे बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. भूकंप होत असल्याची जाणीव होताच लोक घरातून धावत बाहेर आले. भूकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातवरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. भूकंपामुळे काही भागात नेटवर्कची समस्या निर्माण झाली.

हरनई परिसर पाकिस्तानाताली बलूचिस्तानमध्ये येतो. भूकंपाची माहिती मिळताच क्वेटामधून बचाव पथक आणि मदत रवाना झाली आहे. लवकरच येथे मदतकार्य सुरु होईल, असा अंदाज स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे. तुर्तास तेथील जखमींना हरनई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जात आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जिथं उपचार सुरु आहेत, त्या रुग्णालयात वीज नाही. त्यामुळे मोबाईल टॉर्चच्या मदतीनं डॉक्टर उपचार करत आहेत.

loading image
go to top