जपानमध्ये भूकंप तीन ठार; 40 जखमी 

पीटीआय
मंगळवार, 19 जून 2018

जपानच्या पश्‍चिम भागात असलेल्या ओसाका येथे आज सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिक्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 इतकी होती. या भूकंपात तीन जण मृत्युमुखी पडले असून, त्यात 9 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. चाळीसहून अधिक जखमी झाले असून, आपत्कालीन स्थितीमुळे शहरातील रेल्वेसेवा आणि मेट्रोसेवा स्थगित केली आहे. 

टोकिओ : जपानच्या पश्‍चिम भागात असलेल्या ओसाका येथे आज सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिक्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 इतकी होती. या भूकंपात तीन जण मृत्युमुखी पडले असून, त्यात 9 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. चाळीसहून अधिक जखमी झाले असून, आपत्कालीन स्थितीमुळे शहरातील रेल्वेसेवा आणि मेट्रोसेवा स्थगित केली आहे. 

भूकंपाचे केंद्रबिंदू ओसाकाच्या उत्तर भागात 13 किलोमीटर खोलीवर होते. सुरवातीला भूकंपाची तीव्रता 5.9 रिक्‍टर स्केलवर नोंदली गेली. काही तासानंतर ती 6.1 वर पोचली. भूकंपामुळे ओसाका शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी इमारतीच्या भिंती ढासळल्या आहेत. याशिवाय शॉर्टसर्किटमुळेदेखील काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

मृतात दोन ज्येष्ठांचा समावेश असून, त्यांचे वय 80 पेक्षा अधिक आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. उत्तर ओसाका शहरात स्विमिंग पूल परिसरात भिंत कोसळल्याने त्याखाली मुलगी दबली गेली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake shakes Osaka: three dead and 40 injured