Ecuador : स्फोटक हल्ल्यात पाच पोलिस ठार; राष्ट्रपतींनी आणीबाणी केली जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ecuador Five Policemen Killed in Explosive Attack

इक्वेडोरची तुरुंग प्रणाली बऱ्याच काळापासून समस्यांना तोंड देत आहे.

Ecuador : स्फोटक हल्ल्यात पाच पोलिस ठार; राष्ट्रपतींनी आणीबाणी केली जाहीर

इक्वेडोर : दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये (South American Country Ecuador) पुन्हा एकदा कैद्यांचा तांडव पाहायला मिळालाय. कैद्यांच्या हस्तांतरणादरम्यान झालेल्या स्फोटक हल्ल्यात इक्वेडोरचे किमान पाच पोलीस अधिकारी ठार झालेत. यानंतर इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष गुलेर्मो लॅसो (Guillermo Lasso) यांनी दोन प्रांतात आणीबाणी जाहीर केलीय.

राष्ट्राध्यक्ष गुलेर्मो लॅसो यांनी या घटनेसाठी ड्रग टोळ्यांना जबाबदार धरलंय. राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, काल रात्री आणि आजच्या दरम्यान ग्वायाकिल आणि एस्मेराल्डासमध्ये जे घडलं, ते स्पष्टपणे त्यांचे विचार प्रतिबिंबित करतं. या लोकांवर आम्ही कडक कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जेणेकरून हा वाढता हिंसाचार रोखता येईल.

हेही वाचा: Shiv Sena : कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांची पुन्हा अडवणूक; विजय देवणेंना परत पाठविलं महाराष्ट्रात!

दोन प्रांतात आणीबाणीची घोषणा

इक्वेडोरच्या राष्ट्राध्यक्षांनी ग्वायाकिल आणि एस्मेराल्डा (Guayaquil and Esmeralda) प्रांतात आणीबाणी घोषित केलीय. ते म्हणाले, 'सुरक्षा दल दोन्ही प्रांतांमध्ये कारवाई तीव्र करतील आणि स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजल्यापासून कर्फ्यू लागू केला जाईल.' पोलिसांनी ट्विटव्दारे सांगितलं की, दिवसभरात तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून एस्मेराल्डामध्ये तीन स्फोट झाल्याची नोंद झालीय. कैद्यांच्या हस्तांतरणास विरोध करणाऱ्या कैद्यांनी सात तुरुंग अधिकाऱ्यांना ओलीस ठेवलं आहे.

हेही वाचा: Amit Shah : 'काँग्रेसच्या काळात जवानांचे शिरच्छेद, आम्ही पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांना उडवलं'

हिंसक घटनांमध्ये आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू

एसएनएआयनं सांगितलं की, अधिकाऱ्यांना चर्चेनंतर सोडण्यात आलं आहे. इक्वेडोरची तुरुंग प्रणाली बऱ्याच काळापासून समस्यांना तोंड देत आहे. 2020 च्या अखेरीस इक्वेडोरच्या तुरुंगांमध्ये हिंसाचाराच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. यामध्ये किमान 400 लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :americaglobal news