तुरुंगात ड्रग्ज तस्करांचे गँगवॉर; ५२ कैद्यांचा मृत्यू |Ecuador | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुरुंगात ड्रग्ज तस्करांचे गँगवॉर; ५२ कैद्यांचा मृत्यू

तुरुंगात ८ हजार कैदी असून पोलिसांनी ड्रोनने पाहिले असतात तीन पॅव्हेलियनमध्ये कैद्यांकडे बंदुक आणि स्फोटके होती अशी माहिती मिळाली होती.

तुरुंगात ड्रग्ज तस्करांचे गँगवॉर; ५२ कैद्यांचा मृत्यू

इक्वाडोअरमधील सर्वात मोठ्या तुरुंगात पुन्हा एकदा गँगवॉर झाले. यात तब्बल ५२ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. इक्वाडोरमधील सर्वात मोठा तुरुंग असलेल्या लिटोरल पेनिटेंशरीमध्ये शनिवारी हे गँगवॉर झाले. ड्रग्ज माफियांमध्ये झालेल्या या गँगवॉरमध्ये अनेक तास गोळीबार सुरु होता. ३० हून अधिक कैदी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रात्री उशिरापर्यंत गोंधळ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु होते.

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीशी संबंधित दोन गटांमध्ये वाद झाला. गुआयाकिल तुरुंगात शनिवारी सकाळपासूनच हा वाद झाला. सोशल मीडियावर या तुरुंगातले काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात काही मृतदेह तुरुंगात जमिनीवर पडल्याचे दिसत आहे.

गव्हर्नर पाब्ले अरोसेमेना यांनी सांगितलं की, सुरुवातीचा वाद जवळपास ८ तास चालला. कैद्यांनी पॅव्हेलियनमध्ये दोनमध्ये जाण्यासाठी भींत डायनामाइटने उडवण्याचा प्रयत्न केला तसंच आगही लावली. आम्ही अंमली पदार्थ तस्करांविरोधात लढत असून हे खूप कठीण असल्याची भावना अरोसेमेना यांनी व्यक्त केली.

याआधी दोन महिन्यांपूर्वीसुद्धा लिटोरल तुरुंगात तस्करांमध्ये वाद झाला होता. तेव्हा झालेल्या वादातून तब्बल ११९ जणांनी जीव गमावला होता. तुरुंगात ८ हजार कैदी असून पोलिसांनी ड्रोनने पाहिले असतात तीन पॅव्हेलियनमध्ये कैद्यांकडे बंदुक आणि स्फोटके होती अशी माहिती मिळाली होती.

loading image
go to top