esakal | व्यापारयुद्धाचे पडसाद 'जी 7' वर नाही : ट्रम्प 
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारयुद्धाचे पडसाद 'जी 7' वर नाही : ट्रम्प 

चीन व अमेरिकेतील व्यापारयुद्धाचे पडसाद "जी 7' संघटनेवर पडण्याची शक्‍यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी नाकारली. मात्र, हा संघर्ष अधिक तीव्र होऊ न देण्याचा प्रयत्न करण्याचे संकेत त्यांनी दिले. 

व्यापारयुद्धाचे पडसाद 'जी 7' वर नाही : ट्रम्प 

sakal_logo
By
पीटीआय

बिआरिट्‌झ (फ्रान्स) : चीन व अमेरिकेतील व्यापारयुद्धाचे पडसाद "जी 7' संघटनेवर पडण्याची शक्‍यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी नाकारली. मात्र, हा संघर्ष अधिक तीव्र होऊ न देण्याचा प्रयत्न करण्याचे संकेत त्यांनी दिले. 

" ते व्यापारयुद्धाचा आदर करतील, अशी मला आशा आहे. हे होतच राहते,'' असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. "जी 7' संघटनेतील अन्य सदस्य देशांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. चीन व अमेरिकेत पेटलेल्या व्यापारयुद्धावर अन्य नेते टीका करतील का?, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, नाही. अजिबात नाही.

मी असे काही ऐकलेले नाही. मात्र, व्यापारयुद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जो धोका निर्माण झाला आहे, त्याबद्दल "जी 7'मधील युरोपीय सदस्य देशांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे. 

loading image
go to top