इजिप्तमध्ये सापडले राजा फराओच्या भव्य मंदिराचे 2400 वर्षापूर्वींचे जुने अवशेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Egypt

इजिप्शियन आणि जर्मन तज्ज्ञांच्या पथकानं हा शोध लावलाय.

इजिप्त : राजा फराओच्या भव्य मंदिराचे जुने अवशेष सापडले

काहिरा : पिरॅमिडचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इजिप्तमध्ये (Egypt) पुरातत्वशास्त्रज्ञांना राजा फराओच्या (King Pharaoh) भव्य मंदिराचे 2,400 वर्षे जुने अवशेष सापडले आहेत. या अवशेषांमध्ये अनेक कोरीव दगड आहेत. ज्यावर रहस्यमय शिलालेख घडविले आहेत. इजिप्शियन आणि जर्मन तज्ज्ञांच्या पथकानं हा शोध लावलाय. हे अवशेष हेलीपोलिस येथील मतरिया भागात सापडले आहेत. प्राचीन काळी मतराया हा हेलीपोलिसचा एक भाग होता.

हे कोरीव दगड आणि तुकडे बेसाल्टचे बनले असून ते पश्चिम-उत्तर आघाडीच्या राजा नेक्टानेबोच्या (King Nactanebo) मंदिराचे असल्याचे मानले जात आहे. राजा नेक्टानेबो (प्रथम) यानं प्राचीन इजिप्तमधील शेवटच्या राजवंशाची स्थापना इसवी सनपूर्व चौथ्या शतकात केली. या भागाच्या पूर्वेला नाईल नदी वाहते. इजिप्तच्या पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे, की हे कोरीव दगड राजा नेक्टानेबोच्या कारकिर्दीतील 13 व्या आणि 14 व्या शतकातील आहेत.

हेही वाचा: तालिबान्यांच्या दहशतीनं 3 लाख लोक अफगाणिस्तानातून पळाले इराणला

शोध पथकाला लंगूरचीही मूर्ती सापडली

हा काळ सुमारे 367-366 इसवी सनपूर्वचा आहे. याचा शोध लावणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की असे अनेक दगड सापडले आहेत. ज्यांची पूर्ण शिल्पे झालेली नाहीत. एवढंच नाही, तर राजाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर कोणतंही अतिरिक्त काम करण्यात आलं नाही. या टीमला लंगूरची मूर्तीही सापडलीय. याशिवाय भगवान शू आणि देवी तेफनट यांची समाधीही सापडलीय. हे राजा पसामतिक II यानं बांधलं होतं. राजा पसामतिक (King Psamtik) दुसरा यानं 595 ते 589 च्या दरम्यान राज्य केलं. राजा नेक्टानेबो I यानं त्याच्या कारकिर्दीचा बराचसा काळ अचाइमेनिड साम्राज्याशी युद्धात घालवला. अचाइमेनिड साम्राज्याचं (Achaemenid Empire) शासक पर्शियाचं होतं आणि त्यांना इजिप्त काबीज करायचं होतं. राजा नेक्टानेबो यानं त्याच्या राज्यात अनेक मंदिरं आणि बांधकाम प्रकल्प पूर्ण केले आहेत.

loading image
go to top