धक्कादायक! पाळीव मांजरींनी खाल्लं मृत मालकिणीचं शरीर

या मांजरींनी मृतदेहाचं अर्ध शरीर खाल्लं होतं
Cat
Cat

मुक्या प्राण्यांची आवड असणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक जण पाहायला मिळतात. त्यामुळेच प्राणीप्रेमी असणाऱ्या अनेकांच्या घरात एक तरी पाळीव प्राणी नक्कीच पाहायला मिळतो. यामध्येच कुत्रा (dog), मांजर (cat) हे पाळीव प्राणी तर अनेकांच्या लाडाचे असतात.त्यामुळे अनेक जण या प्राण्यांवर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करतात. विशेष म्हणजे हे प्राणीदेखील आपल्या मालकावर तितकंच प्रेम करत असतात. परंतु, सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही पाळीव मांजरींनी आपल्या मृत मालकिणीचं शरीर खाल्ल्याची द सनच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे. (elderly-womans-body-found-eaten-from-the-waist-up-by-her-cats-in-madrid-spain)

सोशल मीडियावर चर्चेत आलेली घटना स्पेनमधील माद्रिद येथे घडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकटीच राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचं निधन झाल्यानंतर तिच्या पाळीव मांजरींनी तिचं शरीर कमरेपर्यंत खाल्ल्याचं आढळून आलं आहे. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Cat
गाय-वासराला पाणीपुरीची भुरळ; पाहा भन्नाट व्हिडीओ

नेमकं काय आहे प्रकरण?

माद्रिदमध्ये एक वृद्ध महिला अनेक वर्षांपासून आपल्या पाळीव मांजरींसोबत एकटीच राहत होती. मात्र, अनेक दिवसांपासून तिच्या घरातून सतत कुबट, कुजलेला वास येत होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी याविषयीची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वृद्ध महिलेच्या घराचा दरवाजा उघडला आणि धक्कादायक चित्र त्यांच्या समोर आलं. वृद्ध महिलेचा मृतदेह समोर छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता आणि तिच्या ७ मांजरी या शरीराचे लचके तोडत होत्या. इतकंच नाही तर जवळपास कमरेपर्यंत या महिलेचं शरीर मांजरींनी खाल्लं होतं.

complaint against Cats on sarathi in pimpri
complaint against Cats on sarathi in pimpri

१९९६ पासून वृद्ध महिला राहत होती एकटीच

मृत पावलेल्या महिलेचं नाव Clara Ines Tobon असं असून त्या १९९६ पासून एकट्या राहत होत्या. त्यांचं संपूर्ण कुटुंब कोलंबियामध्ये स्थायिक होतं.

दरम्यान, या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटवण्यात आला असून तिच्या पाळीव मांजरींना रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवलं आहे. यापैकी दोन मांजरींना अॅनिमल रेस्क्यु सेंटरमध्ये पाठवलंय. तर, अन्य ५ मांजरींची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com