गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असणाऱ्या जगातल्या लहान उंचीच्या एलीफ कोकामनचा मृत्यू l Elif Kocaman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elif Kocaman

2011 मध्ये जगातले सगळ्यात लहान असणाऱ्या एलीफचे रेकॉर्ड ब्रेक केले अमेरिकेचे ब्रिगेड जॉर्डन यांनी.

जगातील सर्वात लहान उंचीची महिला 'एलीफ कोकामन'चा मृत्यू

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) जगातील सगळ्यात उंचीने लहान नोंद असणारी पहिली मुलगी एलीफ कोकामनचा (वय 33) (Elif Kocaman) मृत्यू झाला आहे. तुर्कीतील (Turkey) उस्मान प्रांतातील कादिरली शहरात ती राहत होती. २०१० मध्ये तिचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले होते. सध्या एलीफची उंची २.५ फुट होती.

मिरर'मध्ये आलेल्या माहितीनुसार, एलीफची मंगळवारी (ता.२८) अचानक तब्येत बिघडली. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिच्यावरील उपचाराला फारसा प्रतिसाद मिळत गेला नाही. गुरुवारी (ता.३१) अखेर तिची प्राणज्योत मालावली.

नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आले तेव्हा ती म्हणाली होती, लहानपणी शाळेत असताना इतर मुलं मला खूप चिडवत होती. मात्र माझ्या या उंचीमुळे माझी एक वेगळीच ओळख निर्माण झाली. मला माझ्या उंचीचा अभिमान आहे. मला खात्री होती की, एक ना एक दिवस जगामध्ये मी माझ्या उंचीमुळे ओळखली जाईन.परमेश्वराने मला वेगळ्या पद्धतीने तयार केले आहे. मला विश्वास आहे की मला कधी ना कधीतरी माझा जीवनसाथी मिळेल.

तिच्या आईने सांगितले की, एलिनाचा जन्म इतर नॉर्मल मुलांप्रमाणे झालेला आहे. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिचे वजन 1.6 किलो होते. सुरुवातीला तिच्या उंची विषयी आम्ही दखल घेतली नाही. मात्र जेव्हा ती शाळेत जाऊ लागली तेव्हा मात्र इतर मुलांच्या तुलनेत तिची उंची कमी दिसू लागली. जेव्हा ती चार वर्षाची झाली तेव्हा तिची उंची 2.5 फूट होती.आम्ही खूप डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र ती दहा वर्षाची झाली तरी तिच्या उंचीत काही फरक पडला नाही.

2011 मध्ये जगातले सगळ्यात लहान असणाऱ्या एलीफचे रेकॉर्ड ब्रेक केले अमेरिकेचे ब्रिगेड जॉर्डन यांनी. त्यांची उंची 2.3 फूट होती. जॉर्डनचा मृत्यू 2019 मध्ये झाला. सध्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताची ज्योती किसान चे नाव समोर आले आहे. तिची उंची 62.8 सेंटीमीटर आहे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top