अॅलन मस्क यांनी गमावलं अव्वल स्थान; एका ट्विटमुळे बुडाले १५.२ बिलियन डॉलर

Elon Musk loses 15 billion dollar in a day after Bitcoin warning
Elon Musk loses 15 billion dollar in a day after Bitcoin warning

अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी 'टेस्ला' आणि रॉकेट बनवणारी कंपनी 'स्पेसएक्स'चे मालक अॅलन मस्क यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील प्रथम क्रमांकाचं स्थान गमावलं आहे. यासाठी त्यांच एक ट्विट कारणीभूत ठरलं असून या ट्विटमुळे त्यांना १५.२ बिलियन डॉलरचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत घट होऊन त्यांना प्रथम क्रमांकावरुन पायउतार व्हावं लागलं. 

मस्क यांनी काय केलं होतं ट्विट?

अॅलन मस्क यांनी नुकतचं एका ट्विटद्वारे जाहीर केलं होतं की, टेस्लानं १.५ बिलियन डॉलरचं बिटकाइन (आभासी चलन) खरेदी केलं आहे. मस्क यांच्या घोषणेनंतर बिटकॉनच्या किंमतीनं नवा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, आता बिटकॉइनच्या किंमतीत मोठी घट झाल्याने अॅलन मस्क यांनाही मोठं नुकसानं सोसावं लागलं आहे. दरम्यान, बिटकॉइन आणि इथरच्या किंमती जास्त आहेत, असं विधान नुकतचं मस्क यांनी केलं होतं त्यानंतर ही घट पहायला मिळाली आहे. यामुळे सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये ८.५ टक्क्यांनी मोठी घट झाली. यामुळे मस्क यांच्या संपत्तीत १५ बिलियन डॉलरपेक्षा अधिक घट झाली.

अॅमेझॉनचे मालक पुन्हा अव्वल स्थानी

संपत्तीत घट झाल्यानंतर मस्क १८३.४ बिलियन डॉलर संपत्तीसह ब्लूमबर्गच्या जगातील ५०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आले आहेत. तर अॅमेझॉन या ई कॉमर्स कंपनीचे मालक जेफ बेजोस हे पुन्हा एकदा अव्व्ल स्थानी विराजमान झाले आहेत. 

अॅलन मस्क यांची रॉकेट बनवणारी कंपनी स्पेसेक्सने याच महिन्यात गुंतवणूकदारांचा गट सेक्विया कॅपिटलकडून ८५० मिलियन डॉलरची गुंतवणूक मिळवली. यामुळे मस्क यांच्या संपत्तीत ११०० कोटी डॉलरचा फायदा झाला. इंडेक्सच्या माहितीनुसार, स्पेसेक्सची राउंड व्हॅल्यू सुमारे ७४ बिलियन डॉलर आहे. ऑगस्टच्या तुलनेत यामध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मस्क यांच्या संपत्ती ११ बिलियन डॉलरची वाढ झाली असून ती २०,००० कोटी डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत त्यांची संपत्ती ९२० कोटी डॉलरने वाढली आहे. तर याच वर्षी त्यांच्या संपत्तीत ३०२० कोटी डॉलरची भर पडली आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com