
वॉशिंग्टन : विविध सरकारी विभागांमध्ये कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे नागरिकांची नाराजी ओढवून घेतलेले उद्योगपती एलॉन मस्क यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारमधून बाहेर पडण्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांची कपात, सरकारी संस्थांचे अवमूल्यन आणि सरकारविरोधात शेकडो याचिका यांनी भरलेली त्यांची अल्पकालीन कारकीर्द संपुष्टात येणार आहे.