
मालक होताच एलॉन मस्कने सूत्रं हलवली; ट्रम्प यांच्यावरची बंदी हटवण्याची घोषणा
प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतला. त्यानंतर आता त्यांनी एक मोठा निर्णय़ घेतला आहे. काही वर्षांपूर्वी ट्विटरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही विधानांमुळे त्यांच्यावर बंदी घातली होती. ही बंदी उठवणार असल्याची घोषणा एलॉन मस्क यांनी काल केली.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्कने ही बंदी चुकीची असल्याचंही विधान केलं आहे. मस्क म्हणाले, मी आणि ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांचा असा विश्वास आहे की कायमस्वरुपी बंदी घालणं हा अगदीच दुर्मिळ उपाय आहे. चुकीचा संदेश देणारे आणि बॉट्सच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या खात्यांसाठी हा पर्याय वापरायला हवा.
मस्क पुढे म्हणाले, चुकीचे आणि वाईट ट्विट्स डिलीट करायला हवेत किंवा कोणाला दिसणार नाहीत, अशी सुविधा करायला हवी. एवढंच नव्हे तर खातं तात्पुरतं रद्द करणं हेही चालू शकतं. कायमस्वरुपी बंदी घातल्याने ट्विटरवरचा विश्वास कमी होऊ शकतो. ट्विटर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.
Web Title: Elon Musk Says Twitter Will Lift The Ban On Donald Trump
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..