Elon Musk Twitter : नोकरी वाचवण्यासाठी ऑफिसमध्येच झोपतात कर्मचारी, इलॉन मस्कची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk Twitter

Elon Musk Twitter : नोकरी वाचवण्यासाठी ऑफिसमध्येच झोपतात कर्मचारी, इलॉन मस्कची दहशत

Twitter tight deadlines : एका ट्वीटर कर्मचारीने मस्क द्वारा देण्यात आलेल्या डेडलाइन पूर्ण करून ओव्हर टाइम केल्यानंतर ऑफीसमध्येच जमिनीवर झोपलेल्या आपल्या महिला बॉसचा फोटो शेअर केला आहे. इलॉन मस्क यांनी धुरा सांभाळल्यानंतर काही दिवसातच हा फोटो समोर आला आहे.

या फोटोत प्रॉडक्शन मॅनेजमेंट डारेक्टर एस्तेर क्रॉफर्ड स्लिपींग बॅग गुंडाळून झोपलेली दिसत आहे. हा फोटो ट्वीटर स्पेस प्रॉडक्ट मॅनेजर इवान जॉन्सने ट्वीट केला आहे. त्याने यात लिहीलं आहे की, जेंव्हा तुम्हाला तुमच्या बॉसकडून काही हवं असतं.

हेही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

हेही वाचा: नोकरीबाबत महत्वाची माहिती समोर; Elon Musk ट्विटरच्या 50 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत!

त्यावर क्रॉफर्डने फोटोला रीट्वीट करून लिहिलं की, जेंव्हा तुमची टीम २४ तास काम करत असेल तर कधी कधी तुम्ही #SleepWhereYouWork जिथे काम करतात तिथे झोपून जातात.

हेही वाचा: Elon Musk Secret: श्रीरामाशिवाय इलॉन मस्क फेल! प्रत्येक मोठ्या निर्णयात घेतो श्रीरामाची मदत

असं म्हणतात की, काही दिवसांपासू सतत बातम्यांचा विषय ठरणाऱ्या ट्वीटरच्या नव्या व्हेरीफिकेशन सिस्टीमवर काम करणाऱ्या टीमला सांगण्यात आलं आहे की, काम पूर्ण होईपर्यंत त्यांना २४/७ काम कारावं लागेल.

टॅग्स :TwitterElon Muskdeadline