esakal | ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएन्टचा धोका; निर्बंध 4 आठवड्यांसाठी वाढवले
sakal

बोलून बातमी शोधा

boris johnson

जगभरात कोरोना महामारीचे थैमान सुरुच आहे. विषाणू दिवसेंदिवस आपलं रुप बदलत आहे. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आणणे कठीण जात आहे.

ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएन्टचा धोका; निर्बंध शिथिल नाहीच

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लंडन- जगभरात कोरोना महामारीचे थैमान सुरुच आहे. विषाणू दिवसेंदिवस आपलं रुप बदलत आहे. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आणणे कठीण जात आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील ( delta variant spreads) अनेक देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे यूरोपसह अन्य देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटनसह इतर यूरोपीय देश निर्बंधातून सूट देण्याच्या कोणत्याही तयारीत नाहीत. शिवाय तज्त्रांनी इशारा दिलाय की डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडू शकते. (England delays Covid reopening for four weeks until July 19as the delta variant spreads UK Prime Minister Boris Johnson)

जागतिक आरोग्य संघटना आणि यूकेमधील अधिकाऱ्यांनी डेल्टा व्हेरिएंटबाबत इशारा दिला आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमधील 90 टक्के कोरोना रुग्ण डेल्टा व्हेरिएंटमुळे प्रभावित आहेत. ब्रिटनमध्ये जवळपास 80 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. शिवाय 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. असे असले तरी डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळ खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा: लशीनंतर मृतांचे प्रमाण ०.०१ टक्के; देशात आतापर्यंत ४८८ जणांचा मृत्यू

ब्रिटनमध्ये चार आठवड्यांसाठी वाढला लॉकडाऊन

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता ब्रिटनने लॉकडाऊनचे निर्बंध चार आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्ससन (UK Prime Minister Boris Johnson) यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याआधी 21 जूनला निर्बंध हटवले जाणार होते. पण, आता 19 जूलेपर्यंत निर्बंध कायम राहतील. ब्रिटनमध्ये रविवारी कोरोना विषाणूचे 7490 रुग्ण आढळले होते आणि 8 लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यापेक्षा कोरोना रुग्णांच्या संख्येत 49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्त्रांनी यामागे डेल्या व्हेरिएंट असल्याचं म्हटलंय.

जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता की, डेल्टा व्हेरिएंट संपूर्ण यूरोपमध्ये पसरु लागला आहे. अनेक देशांनी कोरोना निर्बंधातून सूट दिली, त्यामुळे व्हेरिएंटला पसरण्यास वाव मिळाला आहे. त्यामुळे यूरोपात कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटवू नये. डेल्टा व्हेरिएंट लसीपासून वाचण्यास सक्षम दिसत आहे. त्यामुळे 60 वर्षांपुढील व्यक्तीनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, भारतामध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे निर्बंध शिथिल करणे धोक्याचे ठरु शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

loading image
go to top