लस राहू द्या, आता गोळी आली! कोरोना टॅब्लेटला इंग्लंडमध्ये मान्यता

प्रातिनिधिक छायाचित्र (tablet)
प्रातिनिधिक छायाचित्र (tablet) tablet

जगभरात कोरोनाचा प्रभाव कमी होत असला, तरीही तिसऱ्या लाटेचं संकट अद्याप संपलेलं नाही. ठिकठिकाणी लसीकरण सुरू आहे. अनेक देशांमध्ये सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. भारतातही जवळपास 30 कोटी लोकांना दोनही डोस मिळाले आहेत.

येणाऱ्या काळात लस टोचण्यापेक्षा त्याचा ओरल डोस म्हणजेच पोलिओच्या लस सारखी ती तोंडावाटे दिली जाणार असल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. पण इंग्लंडमध्ये लशीची गोळी बनवण्याला स्थानिक सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच कोरोना लसीवरील गोळी उपलब्ध होणार आहे.

इंग्लंडने कोविडवरील उपचारासाठी महत्वाच्या असणाऱ्या पहिल्या अँटिव्हायरल गोळीच्या वापराला परवानगी दिली आहे. ही गोळी बाजारात लवकर आल्यास अशा पद्धतीने उपचार करणारा इंग्लंड जगातील पहिला देश होईल. 18 वर्षांहून मोठ्या नागरिकांसाठी याची मान्यता मिळाली आहे. या औषधाचे नाव 'मोल्नुपिरावीर' (molnupiravir) आहे. कोरोनाचा सौम्य संसर्ग असलेल्या लोकांना ही गोळी दिवसातून दोनदा घ्यावी लागेल.

क्लिनिकल चाचण्यांमध्ये फ्लूवर उपचार करण्यासाठी विकसित केलेली गोळी हॉस्पिटलायझेशन केल्यानंतर मृत्यूचा धोका निम्म्याने कमी करते. इंग्लंडचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. कोरोनावरील उपचार आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी ही गोळी "गेमचेंजर" आहे.

"आज आपल्या देशासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण यूकेने आता कोविडसाठी घरात घेता येणाऱ्या अँटीव्हायरस गोळीला मंजुरी देण्यात आली आहे. हे करणारा यूके जगातील पहिला देश आहे", असे आरोग्य सचिव म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com