महिला खासदाराची कोरोना असूनही संसदेत एन्ट्री; पक्षातून हकालपट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 2 October 2020

महिला खासदार मार्गारेट फेरीयर यांनी कोरोना संसर्ग झालेला असूनही ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रवेश केला

लंडन- महिला खासदार मार्गारेट फेरीयर यांनी कोरोना संसर्ग झालेला असूनही ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रवेश केला. इतकेच नव्हे तर त्यानंतर सार्वजनिक वाहनाने प्रवासही केला. मार्गारेट 60 वर्षांच्या असून त्यांची स्कॉटीश नॅशनल पार्टीने हकालपट्टी केली आहे. राजीनामा सादर करण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे. बुधवारी त्यांनी कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ कॉमन्स) हजेरी लावली. त्यांनी चार मिनिटे भाषण केले. त्यानंतर त्यांनी लंडन ते एडिंबरा असा प्रवास सार्वजनिक वाहनातून केला. या पक्षाच्या नेत्या तसेच स्कॉटलंडच्या प्रमुख मंत्री निकोला स्टरजेन म्हणाल्या की, आपण मार्गारेट यांच्याशी बोललो असून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारा भाजप नेता...

चौकशी, दंडाची शक्यता

या प्रकरणी मार्गारेट यांची पोलीस चौकशी होऊ शकते. त्यांना चार हजार पौंड (सुमारे पावणे चार लाख रुपये) इतका दंड होऊ शकतो. कोविड-19 निर्बंधांचा भंग केल्याबद्दल मला खेद वाटतो. मी बिनशर्त माफी मागते. माझ्या कृत्याबाबत कोणतीही सबब देता येणार नाही. मी सार्वजनिक वाहनाने प्रवास करायला नको होता. मी या चुकीची जबाबदारी स्वीकारते. अशा चुका कुणीही करू नयेत, असं खासदार मार्गारेट फेरीयर म्हणाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England mp broke corona virus rules expelled from party