
भारतीयांनो, 'आजीबाईचा बटवा' परदेशी नेताय? ही काळजी घ्या, नाहीतर...
परदेशात विशेषतः अमेरिकेला जाणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची सूचना. परदेशी जात असताना बऱ्याचदा आपण प्रथमोपचार पेटी बरोबर घेतो. ज्यामध्ये तापापासून अॅसिडिटी, उलट्या-जुलाबासाठी गोळ्या असतात. अर्थात स्वतःची आणि आपल्या सोबतच्या माणसांची काळजी म्हणून आपण औषधांचा बटवा सोबत घेऊन जातो. पण हीच सवय आता महागात पडणार आहे. (Entry to US is restricted if you are found carrying medicines without prescription)
अमेरिकेत औषधं सोबत बाळगण्यासाठीचे नियम फार कडक आहेत. तिथे प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं बाळगण्यास परवानगी नाही. मात्र तरीही अनेक भारतीय परदेशी जाताना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं सोबत बाळगतात. कारण त्यांना वाटतं की त्यांच्याकडची औषधं तपासली जाणार नाही. मात्र जर औषधांसोबत प्रिस्क्रिप्शन नसल्याचं आढळून आलं तर मात्र अमेरिकेत जाणं मुश्किल होऊन बसेल.
प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं सोबत बाळगण्याने तुम्हाला विमानतळावरच रोखलं जाऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचा व्हिसाही रद्द होऊ शकतो. अनेक विमानतळांवर भारतीयांना लोणचं , गरम मसाले सोबत नेण्यास परवानगी आहे, मात्र प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं नेण्यास सक्त मनाई आहे.
काय आहेत औषधं सोबत बाळगण्याचे नियम? जाणून घ्या...
अमेरिकेत औषधं घेऊन येण्यासाठी प्रिस्क्रिप्शन अथवा डॉक्टरांचं पत्र सोबत असणं गरजेचं आहे.
ही औषधं त्यांच्या मूळ पॅकिंगमध्येच असायला हवीत आणि त्यावर डॉक्टरांच्या सूचनाही लिहिलेल्या असाव्यात.
वैयक्तिक वापरासाठीचीच औषधं फक्त नेता येईल. त्यापेक्षा जास्त औषधं सोबत बाळगता येणार नाहीत.
सर्व प्रकारची औषधं, आयव्ही बॅग्ज, सिरिंज, फ्रीझर पॅक्स यावर स्पष्ट लेबल्स असणं गरजेचं आहे.
Web Title: Entry To Us Will Be Restricted If You Carry Medicines Without Prescription
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..