
युरोपियन युनियनने पाकिस्तानला शुक्रवारी कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक आणि सुरक्षाविषयक घडामोडींना चालना देण्यासाठी १६ कोटी ३० लाख डॉलरहून आधिकच्या आर्थिक मदत जाहीर केली असल्याची माहिती युरोपियन युनियनतर्फे (ईयू) शुक्रवारी देण्यात आली.
इस्लामाबाद - युरोपियन युनियनने पाकिस्तानला शुक्रवारी कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक आणि सुरक्षाविषयक घडामोडींना चालना देण्यासाठी १६ कोटी ३० लाख डॉलरहून आधिकच्या आर्थिक मदत जाहीर केली असल्याची माहिती युरोपियन युनियनतर्फे (ईयू) शुक्रवारी देण्यात आली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या संदर्भात युरोपियन युनियनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या जागतिक साथीच्या संकटकाळात पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानमधील ईयूचे राजदूत अँड्रोल्ला कामिनारा यांनी गुरुवारी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी ईयूतर्फे देण्यात आलेली मदत त्यांनी इम्रान यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती या निवेदनात दिली.