पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवरून काढले एव्हरेस्टचे छायाचित्र | Picture Of Mount Everest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Everest Mountain
पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवरून काढले एव्हरेस्टचे छायाचित्र | Picture Of Mount Everest

पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवरून काढले एव्हरेस्टचे छायाचित्र

वॉशिंग्टन : एव्हरेस्ट शिखर अंतराळातून कसे दिसत असेल तर याची उत्सुकता वाटत असेल तर ती ते सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात असलेले ‘नासा’चे अंतराळवीर मार्क वेंड ही यांनी नव्या वर्षात काढलेल्या छायाचित्रातून त्याचा शोध घेता येईल. पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवरून काढलेल्या या छायाचित्रात बर्फाळ हिमालय महाकाय वृक्षासारखा दिसत आहे, ज्याची मुळे जमिनीवर पसरलेली आहेत. त्याच्यामध्ये एव्हरेस्ट नजरेस पडतो (Everest Mountain Picture 400km along from Earth)

एव्हरेस्टचे अद्‍भूत छायाचित्र मार्क यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. त्याचबरोबर छायाचित्रात एव्हरेस्ट शोधून दाखवा, असेही आवाहनही त्यांनी केले आहे. सुमारे आठ हजार ८४९ मीटर उंच असलेला एव्हरेस्ट जमिनीवरून सहज दिसू शकतो. पण अंतराळातून त्याचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. जेवढे बाहेर जाता येईल तेवढे जाण्याचा माझा नव्या वर्षाचा संकल्प आहे,’ पण तो मी पृथ्वीवर परतल्यावर,’’ असे ट्विट मार्क यांनी केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top