जास्त व्यायाम तुमच्या मेंदूसाठी धोकादायक!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

अतिप्रमाणात व्यायाम केल्याने तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या निर्णय क्षमतेवर याचा परिणाम होऊ शकतो.

लंडन : दररोज व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. दररोज कसरत केल्याने आरोग्य तंदुरूस्त राहते. मन प्रसन्न राहते. मात्र हाच व्यायाम जर जास्त प्रमाणात झाला. तर मात्र तुम्हाला याचा तोटा होऊ शकतो.

अतिप्रमाणात व्यायाम तुमच्या मेंदूवर परिणाम करू शकतो आणि योग्य निर्णय कधी आणि कसे घ्यावे अशा  प्रकारच्या महत्त्वाच्या कामांत तुम्हाला अडचण येऊ शकते. लंडनच्या एका विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात हा निष्कर्ष समोर आला आहे.

यासाठी काही खेळांडूकरीता 9 आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला. या आठवड्यात त्यांनी अतिप्रमाणात व्यायाम केला. दरम्यान 9 आठवडे झाल्यावर जेव्हा त्या सर्व खेळाडूंची सायकल चालवण्याची चाचणी घेण्यात आली. त्यात अनेक खेळाडू अपयशी झाले. एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू, सायकल चालवण्यासारख्या सोप्या कामातही अपयशी झाल्याने अतिप्रमाणात व्यायाम आपल्याकरीता धोक्याचा असल्याचे समोर आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excessive exercise is dangerous for your brain