Iran Explosion : इराणमधील शाहीद राजाई बंदरावरील स्फोटातील मृतांची संख्या २५ वर
Iran Fire : इराणमधील बंदरात शनिवारी झालेल्या स्फोटात मृतांची संख्या २५ वर पोहोचली आहे. क्षेपणास्त्रासाठी लागणारे इंधन तयार करताना झालेल्या ज्वालाग्रही पदार्थांच्या स्फोटात साडे सातशे लोक जखमी झाले आहेत.
तेहरान : इराणमधील बंदरात शनिवारी झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या २५ झाली आहे. क्षेपणास्त्रासाठी लागणारे इंधन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्वालाग्रही पदार्थांना आग लागल्याने झालेल्या या स्फोटात साडे सातशे जण जखमी झाले आहेत.