दहा अब्ज डॉलर खर्च करुनही 'मेटा'ला झाला तोटा; 'हे' आहे कारण

फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचं दिसून येतंय.
facebook app
facebook appesakal

फेसबुक (Facebook) सोशल मिडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) जगातील सर्वात मोठ्या सोशल साईट्पैकी एक आहे. फेसबुक लाँच झाल्यापासून आज पर्यंत फेसबुक यूजर्सची संख्या सातत्यानं वाढतेय. मात्र बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात फेसबुकला मोठा झटका बसल्याचं समोर आलंय. यासोबतच कंपनीच्या जाहिरातीतही घट होण्याची शक्यता आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर, कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली असून, मेटाचे बाजार मूल्य 200 बिलियनने डॉलरने कमी झालं आहे.

फेसबुकने नुकतंच आपलं नाव बदललं असून, जुनं नाव बदलून मेटा असं ठेवलं आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचं दिसतंय. बुधवारी समोर आलेल्या अहवालानुसार, गेल्या तिमाहीत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांमध्य घट झालीच, मात्र उत्तर अमेरिकेत फेसबुक अॅपच्या रोजच्या वापरकर्त्यांची संख्याही दहा लाखांनी कमी झाली आहे.

facebook app
पाकिस्तानमध्ये लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला, चार दहशतवादी ठार

युजर्स कमी होण्याचं कारण काय?

उत्तर अमेरिका हे असं ठिकाण आहे, जिथे मेटा कंपनी जाहिरातींच्या माध्यमातून सर्वात जास्त कमाई करते. या कपातीमुळे फेसबुकच्या जगभरातील वापरकर्त्यांची संख्याही घटल्याचं दिसून येतंय. फेसबुकच्या दैनंदिन वापरकर्त्यांची संख्या 1.93 अब्ज वरून 1.92 अब्जांवर आली आहे. तरुणांमध्ये फेसबुकबद्दलची आवड कमी होत असल्याचं दिसून येतंय. मात्र, मेटाने इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या स्पष्ट केलेली नाही.

facebook app
राहुल गांधींचं 'ते' वक्तव्य असमर्थनीय; अमेरिकेने सुनावलं

मागच्या काही दिवसांत फेसबुकवर प्रायव्हसी आणि इतर कारणांमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत कंपनी कोणतंही ठोस कारण देऊ शकलेली नाही. दुसरीकडे, टिकटॉक सारख्या इतर अॅप्समुळेही फेसबुकवर परिणाम होताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com