esakal | फेसबुकने दिला यूजरना धक्का

बोलून बातमी शोधा

Facebook}

फेसबुकने ऑस्ट्रेलियातील यूजरना धक्का देत फेसबुकवर बातम्या पाहण्यास आणि शेअरिंग करण्यावर निर्बंध आणले. ऑस्ट्रेलियातील प्रस्तावित माध्यम कायद्यावरुन फेसबुक आणि सरकार यांच्यात ताणाताणी सुरू आहे.

फेसबुकने दिला यूजरना धक्का
sakal_logo
By
पीटीआय

कॅनबेरा - फेसबुकने ऑस्ट्रेलियातील यूजरना धक्का देत फेसबुकवर बातम्या पाहण्यास आणि शेअरिंग करण्यावर निर्बंध आणले. ऑस्ट्रेलियातील प्रस्तावित माध्यम कायद्यावरुन फेसबुक आणि सरकार यांच्यात ताणाताणी सुरू आहे. हा वाद एवढा शिगेला पोचला असून फेसबुकने न्यूज पेज ब्लॉक केले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील आपत्कालीन व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या सरकारने फेसबुकच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या निर्णयानुसार ऑस्ट्रेलियाचे यूजर आता स्थानिक बातम्या किंवा आंतरराष्ट्रीय बातम्या शेअर करू शकणार नाहीत. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलिया बाहेर असणारे आंतरराष्ट्रीय यूजर देखील ऑस्ट्रेलियाच्या बातम्या शेअर करू शकणार नाहीत. 

नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईला 'त्या' दहशतवाद्याची पुन्हा धमकी; म्हणाला...

ऑस्ट्रेलियातील माध्यम कायद्याच्या विरोधात हा निर्णय घेतल्याचे फेसबुकने म्हटले आहे. प्रत्यक्षात हा कायदा फेसबुक, गूगल न्यूज सारख्या कंपन्यांना बातम्या दाखवण्यासाठी मोबदला देण्याबाबतचा आहे. फेसबुकच्या कारवाईने ऑस्ट्रेलियात कोरोना संसर्ग आणि चक्रीवादळाची माहिती देणारे न्यूज पेज दिसणे देखील बंद झाले आहे.

Edited By - Prashant Patil