फेसबुकची 'पाच कोटी नव्हे, तीन कोटी खाती हॅक'

पीटीआय
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

सॅनफ्रान्सिस्को : "फेसबुक'मधील पाच कोटी नव्हे, दोन कोटी नव्वद लाख यूजर्सच्या खात्यांमधील वैयक्तिक माहिती हॅकर्सने मिळविली असल्याचे "फेसबुक'ने आज स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात हॅकिंगबाबतची घटना उघड झाल्यानंतर जगभरातून चिंता व्यक्त झाली होती. आज "फेसबुक'च्या उत्पादन व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष गाय रोझेन यांनी एका पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले. 

"आधी वाटले होते त्यापेक्षा कमी यूजर्सच्या खात्यांवरील माहिती चोरली गेली आहे. हॅकर्सने दीड कोटी यूजर्सची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक, ईमेल अशी माहिती चोरली असून, उर्वरित 1.4 कोटी यूजर्सची यापेक्षा अधिक म्हणजे जन्मतारीख, लिंग, धर्म, इतक्‍यात भेटी दिलेली ठिकाणे अशी माहिती चोरीला गेल्याचे रोझेन यांनी सांगितले. या सायबर हल्ल्याचा परिणाम "फेसबुक'च्या मेसेंजर, मेसेंजर किड्‌स, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सऍप, ऑक्‍युलस, वर्कप्लेस, पेजेस, पेमेंट्‌स, थर्ड पार्टी ऍप्स यांच्यावर झाला नसल्याचेही रोझेन यांनी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebooks Three Crore Accounts Hacked