Queen Elizabeth | इंग्लंडच्या राणीचे हात जांभळे? डॉक्टर म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो सौजन्य - बकिंगहॅम पॅलेस

इंग्लंडच्या राणीचे हात जांभळे? डॉक्टर म्हणाले...

इंग्लंडच्या राणीबद्दल कायम सगळ्यांना कुतूहल असतं. शाही अंदाज आणि राणीचा थाट कायमच सगळ्यांना भूरळ घालतो. क्विन एलिझाबेथ या कायम त्यांच्या काही ना काही गोष्टींमुळे चर्चेत असताता. पण यावेळी त्यांच्याबद्दची चर्चा वेगळी आहे. क्विन एलिझाबेथ आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या रॉयल डिनरचा एक फोटो व्हायरल होतोय. यामध्ये राणीचे हात चक्क जांभळे दिसत आहेत.

मणक्याच्या दुखापतीमुळे एक महिना अंथरुणावर विश्रांती घेतल्यानंतर राणी एलिझाबेथने पुन्हा कामांना सुरुवात केली आहे. 19 नोव्हेंबर रोजी विंडसर कॅसल येथे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल सर निक कार्टर यांना शाही मेजवानी देण्यात आली.

यावेळी राणी आणि निक कार्टर यांचा एक फोटो व्हायरल झाला. नेटिझन्सना राणीच्या हातावर एक विचित्र जांभळा रंग दिसला. बकिंगहॅम पॅलेसने प्रसिद्ध केलेल्या चित्रांमध्ये राणीच्या हातावर रंग तर होताच पण कार्टर यांच्या हातांचा रंगही जांभळा होता. 95 वर्षांच्या या राणीच्या हाताचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रश्न विचारले जात आहेत.

फोटो सौजन्य - बकिंगहॅम पॅलेस

फोटो सौजन्य - बकिंगहॅम पॅलेस

चित्रामध्ये राणी फुलांच्या एका ड्रेसमध्ये ओकच्या खोलीत जनरलसोबत काही घडामोडींवर चर्चा करताना दिसत आहे. यामध्ये तिच्या हातावरील जांभळ्या सावलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अखेर डॉक्टरांनी यावर स्पष्टीकरण दिलं.

शेक्सपियर मेडिकल सेंटरमधील डॉ.जय वर्मा यांच्या मते, हे रेनॉडचे किंवा खरोखरच थंड पडलेले हात असू शकतात. हात थंड पडल्यावर रक्तवाहिन्या अशा दिसतात. जांभळा रंग हा डीऑक्सिजनयुक्त रक्तामुळे येतो, असं त्यांनी 'मेट्रो'ला सांगितलं. अनेकदा वय झाल्याने हातावर रक्तवाहिन्या स्पष्ट दिसू लागतात. सवर्ण व्यक्तींमध्ये याचं प्रमाण जास्त असतं असं ते म्हणाले.

loading image
go to top