esakal | Fact Check : १५ एप्रिलपर्यंत होणार ५० हजार जणांचा मृत्यू?
sakal

बोलून बातमी शोधा

Fact Check : १५ एप्रिलपर्यंत होणार ५० हजार जणांचा मृत्यू?

दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

Fact Check : १५ एप्रिलपर्यंत होणार ५० हजार जणांचा मृत्यू?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे हातपाय पसरले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक हवालदिल झाला आहे. एकीकडे प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृतीचं काम करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवादेखील पसरत आहेत. याच अफवांमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे.  यामध्येच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक नवीनच चर्चा रंगली आहे. त्यानुसार, १५ एप्रिलपर्यंत देशात जवळपास ५० हजार नागरिकांचा मृत्यू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे ही माहिती डब्लूएचओने दिल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात ही खोटी माहिती असून सत्य परिस्थिती काही वेगळी आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने एक फेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये १५ एप्रिलपर्यंत भारतात जवळपास ५० हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडीओ खोटा असून जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पर्व अशिया विभागीय कार्यालयाने हे वृत्त खोट असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, सध्या महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, रुग्णसंख्या पाहता प्रत्येक राज्य सरकारने लसीकरणाच्या संख्येतही वाढ केली आहे.
 

loading image
go to top