एक पाय नसतानासुद्धा शेतात काम करताना दिसतोय शेतकरी; व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

एका शेतकऱ्याने अनेकांना हे शिकविले आहे की, जो एक पाय नसूनही शेतात काम करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. 

पुणे : जर काही काम करायचे असेल तर निमित्त शोधणे हे या जीवनातील सर्वात सोपी गोष्ट बनली गेली आहे. परंतु आपल्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर साऱ्या गोष्टी सहज शक्य असतात. आपण कितीही आव्हानांचा सामना करत असलात तरी आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकता आणि त्यातून आपल्याला मुक्तसुद्धा होता येते. असे अनेक उदाहरण आपल्या आजूबाजूला असतातच. 

ज्या व्हिडिओबद्दल सांगत आहे, तो व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) अधिकारी मधु मेथा यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक पाय नसताना सुद्धा शेतात कष्ट करणार्‍या कष्टकरी शेतकर्‍याची मेहनत या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले आहे की, 'कोणतेही शब्द या व्हिडिओवर न्याय देऊ शकत नाहीत'.

 

हा शेतकरी शेतात काम करण्यासाठी एका हातात फावड़ा आणि दुसर्‍या हातात क्रॉच घेतलेला दिसून येत आहे. या 35 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये त्या शेतकऱ्याचे शेतातील काम दिसत आहे. दृढ इच्छाशक्ती आणि आपल्या क्षेत्रात काम करण्याची आवड असेल तर काहीच अशक्य नसतं. हे पाहावयास मिळत आहे. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून जवळपास तीन लाखांच्यावर पाहिल गेलं आहे. तर काही लोकांनी रीट्वीट करून  काही कमेंटसुद्धा केले आहेत, आणि शेतकर्‍याला कामासाठी प्रोत्साहन करत आहे. कोणतेही काम अशक्य असे कधीच नसते, हे व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच समजते.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer is seen working in the field even though he does not have a leg the video is going viral on social media