मोदी म्हणजे फादर ऑफ इंडिया : डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती आहेत. भारतात सुरुवातीला वादावादी, हल्लकल्लोळाचं वातावरण होतं. मात्र तिथली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगल्या परिस्थितीने हाताळली. 

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान व्यक्ती आहेत. मला आठवते की भारतात सुरुवातीला वादावादी, हल्लकल्लोळाचं वातावरण होते, पण मोदींनी एक वडिलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणले. भविष्यात ते भारताचे पिता असतील, पण आम्ही त्यांना 'फादर ऑफ इंडिया'च म्हणणार, असे तोंडभरून कौतुक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या यशानंतर ट्रम्प यांच्याकडून मोदींची स्तुती केली आहे. ट्रम्प यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्‍मीरबाबत काही तोडगा काढल्यास मला बरेच वाटेल, असे म्हटले आहे. मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रांच्या आगामी आमसभेच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. 

ह्यूस्टनमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमानंतर मोदी-ट्रम्प यांची पुन्हा भेट होऊन चर्चा झाली. त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. 'ट्रम्प हे भारताचे चांगले मित्र आहेत,' असे मोदींनी सांगितले, तर भारताबरोबरच लवकरच नवा व्यापार करार होईल, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली. ट्रम्प म्हणाले, की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती आहेत. भारतात सुरुवातीला वादावादी, हल्लकल्लोळाचं वातावरण होतं. मात्र तिथली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगल्या परिस्थितीने हाताळली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father of India Narendra Modi will take care of terror, Kashmir says Donald Trump