Female Genital Mutilation: महिलांच्या खतनाची प्रथा का आलीये चर्चेत? धर्मात का पालन केली जाते?

महिलांच्या खतनाची प्रथा बंद करण्यासाठी जागतिक पातळवीर प्रयत्न केले जात आहेत. २०३० पर्यंत खतना पद्धत पूर्णपणे संपवण्याचे लक्ष्य यूनिसेफने ठेवले आहे.
FGM
FGM

नवी दिल्ली- महिलांच्या खतनाची प्रथा बंद करण्यासाठी जागतिक पातळवीर प्रयत्न केले जात आहेत. २०३० पर्यंत खतना पद्धत पूर्णपणे संपवण्याचे लक्ष्य यूनिसेफने ठेवले आहे. फीमेल जेनिटल कटिंग (FGM) याला खतना म्हटलं जातं. महिला दिनाच्या दिवशी एक रिपोर्ट सादर करण्यात आला होता. यात सांगण्यात आलं होतं की, जगात खतना झालेल्या २३ कोटी महिला आहेत. (female genital mutilation gambia reversing ban what its importance in religion know fact)

खतना किंवा FGM वर अनेक देशांत बंदी आहे. पण, अद्याप काही देशात ही प्रथा सुरु आहे. शिवाय बंदी असलेल्या काही देशांमध्ये सुद्धा ही प्रथा काही प्रमाणात पाळली जाते. खतना पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गाम्बिया देश. गाम्बिया देशाने खतना प्रथेवर असलेली बंदी उठवण्याचा प्रयत्न सुर केला आहे. त्यामुळे जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

FGM
Health Care News : जिममध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा 'हे' 4 व्यायाम; हृदय अन् मन राहील निरोगी

काय आहे खतना?

FGM किंवा म्युटिलेशनमध्ये महिलेच्या लैंगिक अवयवाचा काही भाग ब्लेड किंवा धारदार वस्तूने कापला जातो. धार्मिक प्रथेनुसार असा क्रूर प्रकार करताना महिलेला बेशुद्ध देखील केले जात नाही. हे सर्व कोणत्याही वैद्यकीय पद्धतीचा अवलंब न करता केलं जातं. विशेष म्हणजे असं करण्याची काहीही आवश्यकता नसते. केवळ धार्मिक प्रथेच्या नावावर हे केले जाते. यात लैंगिक अवयवाच्या वरील क्लिटोरिस भागाला कापले जाते.

FGM
World Happiness Report 2024: जगातील सर्वात आनंदी देशात भारताचा क्रमांक कितवा? आनंदी देश कसा ठरवला जातो?

का केलं जात महिलांचं खतना?

महिलांच्या लैंगिक इच्छांना दाबण्यासाठी या प्रथेचा वापर केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ज्या भागामुळे लैंगिक भावना उत्पन्न होतात, अशा बाह्य लैंगिक अवयवाला कापून टाकलं जातं. अनेक मुलींचे लहान वयातच खतना केले जाते. महिलांनी लग्नाच्या आधी कोणाशी शारिरिक संबंध ठेवू नये, लैंगिक सुख घेऊ नये अशा प्रकारची पुरुषत्ताक समाजाची मानसिकता यामागे असू शकते. पण, या प्रथेला धार्मिक रंग देण्यात आला आहे. ही धार्मिक प्रथा असली तरी याचा धर्मात कुठे आधार आढळत नाही.

किती धोकादायक आहे?

अनेक समुदायांमध्ये या प्रथेने पालन होते. स्थानिक पातळीवरच काही महिला FGM करत असतात. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील काहीही ज्ञान नसतं. शिवाय स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे महिलांवर याचा प्रतिकूल परिणाम पडतो. यामध्ये लहान मुली धक्क्यात जाणे, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव, टिटेनस किंवा संसर्ग होऊ शकतो. खूप जास्त वेदना, ताप, युरिनरी इंफेक्शन होण्याची शक्यता निर्माण होते. संसर्ग नियंत्रणाबाहेर गेल्यास महिलेचा जीव देखील जाऊ शकतो.

FGM
International Day of Happiness 2024 : निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी 'या' योगासनांचा दररोज करा सराव, ताण-तणावापासून मिळेल आराम

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रयत्न

जागतिक आरोग्य संघटनेने या प्रथेवर बंदी आणण्यासाठी सभेमध्ये एक प्रस्ताव मंजूर करुन घेतला आहे. संघटनेने अनेक देशांना ही प्रथा बंद करण्याचे आवाहन केले होते. अनेक देशांनी यावर बंदी देखील आणली आहे. पण, छुप्या पद्धतीने अनेक देशात ही प्रथा पाळली जाते. मुस्लीम बहुल आफ्रिकी देशांमध्ये ही प्रथा प्रामुख्याने पाहिला मिळते. सोमालियामधील तब्बल ९८ टक्के महिलांनी खतना केला आहे. रिपोर्टनुसार, मुस्लीम देशांमध्ये जवळपास ३० टक्के महिलांचं खतना झालं आहे.

गाम्बिया देशाने खतना प्रथेवरील बंदी उठवण्यासाठी मतदान केलं आहे. त्यामुळे याला आता कायदेशीर मान्यता मिळू शकते. धर्मगुरुंच्या दबावामुळे हा कायदा आणला जात आहे. त्यामुळेच मानवाधिकार कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com