esakal | पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस
sakal

बोलून बातमी शोधा

vladimir putin corona vaccin.jpg

कोविड-19 वर प्रभावी लस तयार करण्यासाठी 2021 उजाडेल असे सांगितले जात असताना रशियाने (Russia) आश्चर्याचा धक्का दिला आहे.

पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मॉस्को (Moscow)- जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना कोरोनावरील लस केव्हा येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोविड-19 वर प्रभावी लस तयार करण्यासाठी 2021 उजाडेल असे सांगितले जात असताना रशियाने (Russia) आश्चर्याचा धक्का दिला आहे. रशियाने कोरोनावरील पहिली लस (first vaccine) तयार केली आहे. शिवाय या लसीची नोंदणीही करण्यात आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन  (President Vladimir Putin) यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. 

Beirut Blasts: नागरिकांच्या रोषासमोर अखेर सरकार झुकले

व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी सर्व मंत्रालयांशी व्हिडिओ परिषदेद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी देशाने कोरोनावरील प्रभावी लस तयार केल्याचं घोषीत केलं आहे. शिवाय ही लस शरीरात स्थायी प्रतिकारशक्ती निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या घोषणेमुळे रशियाने कोरोना लसीच्या निर्मितीमध्ये मोठे यश मिळल्याचं दिसत आहे. रशियाचे कोरोना लस निर्मितीची तुलना अवकाश स्पर्धेशी केली आहे. रशियाने 4 ऑक्टोबर 1957 मध्ये पहिल्यांदा स्फुटनिक नावाचा उपग्रह अवकाशात पाठवला होता. रशियाच्या या यशाने सर्व जगाने एका नव्या युगात प्रवेश केला होता. 

मंगळवारी सकाळी जगामध्ये पहिल्यांदा रशियाने कोरोना विषाणूवरील लसीची नोंदणी केली, असं पुतीन म्हणाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीला कोरोनावरील लस देण्यास आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  रशियामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून लसीकरण मोहिम हाती घेण्यात येणार आहे. सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारी, वयस्कर व्यक्ती आणि शिक्षकांना ही लस देण्यात येणार असल्याचं रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे. 

रक्ताळलेले कपडे आणि त्यात गुंडाळलेला चिमुकला जीव; बैरूत स्फोटानंतरचा फोटो...

जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील लस तयार करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. कोणतीही लस तयार करायची म्हटलं तर त्यासाठी 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, रशियाने अगदी कमी वेळात लस तयार करुन दाखवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या या कोविड-19 लसीवर शंका घेतली आहे. रशियाने या लसीच्या संधोधनासंबंधात कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही, त्यामुळे आरोग्य संघटनेने लसीच्या उपयुक्ततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

दरम्यान, जगभरात सध्या 150 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावरील लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. यातील अनेक उमेदवारांनी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे. अमेरिकेची मॉडर्ना आणि ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने मानवी चाचणीचा तिसरा टप्पा गाठला आहे. त्यामुळे या उमेदवारांनी तयार केलेली लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. 


 

loading image
go to top