esakal | स्वच्छ हवेसाठी संयुक्त राष्ट्रे आग्रही; ‘निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा’ दिन साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

blue-sky

हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्याविरोधात कृती करण्यासाठी जगभरात आज प्रथमच जागतिक ‘निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा’  दिन साजरा केला गेला.

स्वच्छ हवेसाठी संयुक्त राष्ट्रे आग्रही; ‘निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा’ दिन साजरा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क - हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्याविरोधात कृती करण्यासाठी जगभरात आज प्रथमच जागतिक ‘निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा’ (क्लीन एअर फॉर ब्लू स्काय) दिन साजरा केला गेला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) महासभेत झालेल्या ठरावाचा एक भाग म्हणून आजचा दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फुफ्फुसाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरणारी प्रदूषित हवा पर्यावरणाचीही कायमस्वरुपी हानी करत असल्याने त्याकडे अधिक दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल, असे संयुक्त राष्ट्रांनी आज म्हटले आहे. हवा प्रदूषणाचे धोके सर्वांसमोर प्रकर्षाने समोर यावेत आणि सर्व देशांनी हा धोका कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, हा हेतू समोर ठेवून दरवर्षी सात सप्टेंबर दिवस जागतिक ‘निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा’ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार आज संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी सर्व देशांशी संवाद साधताना शाश्‍वत विकासासाठी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व देशांना केले.   शाश्‍वत विकास परिषदेत बहुतांशी देशांनी चांगल्या भविष्यासाठी शाश्‍वत विकासाला प्राधान्य देण्याचे मान्य केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संयुक्त राष्ट्रांचे देशांना आवाहन
तापमानवाढीवर नियंत्रण ठेवा
प्रदूषण कमी करण्यासाठी योजना आखा
जैविक इंधनावरील अनुदान बंद करा
स्वच्छ ऊर्जेच्या वापरावर भर द्या
पर्यावरण बचावासाठी जागतिक पातळीवर
सहकार्य वाढवा

सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साजरा करण्याला अधिक महत्त्व आले आहे. व्यक्तिगत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करतानाच हवाप्रदूषणाकडे आणि त्यापासून असलेल्या धोक्यांकडे तातडीने लक्ष देणे आवश्‍यक आहे. 
- संयुक्त राष्ट्रे

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हवाप्रदूषणाची स्थिती
जगातील ९२ टक्के जनतेला दूषित हवेत जगावे लागते
७० लाखांच्या आसपास जनतेचा लवकर मृत्यू
हवाप्रदूषणाचा मानवी आरोग्य, पर्यावरण, जैवविविधता, परिसंस्था आणि जीवनदर्जावर परिणाम
हवेची स्थिती सुधारल्यास आरोग्य, विकास आणि पर्यावरणाचे फायदे
हवेचा दर्जा हा थेट मानवी आरोग्याशी निगडित
प्रदूषित हवेमुळे कर्करोग, उष्माघात, श्‍वसनाचे विकार होण्याचा मोठा धोका