कोरोनाच्या लशीमुळं 5 लाख शार्कची कत्तल होण्याचा धोका!

टीम ई-सकाळ
Monday, 28 September 2020

शार्क अलाइज् संस्थेची संस्थापक स्टीफनी ब्रेन्डिल यांनी म्हटले आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर सागरी जीव मारणे, उचित होणार नाही. मुळात शार्कमध्ये प्रजनन मोठ्या प्रमाणावर होत नाही.

जगभरात कोरोनाचं संकट मानव जातीला आव्हान देतंय. या संकटातून पार होण्यासाठी जगाच्या काना कोपऱ्यात संशोधन सुरू आहे. लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी, यासाठी मेडिकल सायन्स क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळी झटत आहेत. ही लस तयार करताना मात्र निसर्गाचा समतोल ढासळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी शार्क माशाच्या यकृतातील तेल आणि शार्कच्या रक्तातील अंश वापरण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जगातील 5 लाख शार्क माशांचा जीव धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात शार्क संदर्भात संशोधन करणाऱ्या एका संस्थेने कोरोना लस आणि शार्कचे संभाव्य मृत्यू यावरून चिंता व्यक्त केली आहे. या संस्थेचे म्हणणे जगभरातील माध्यमांनी गांभीर्याने घेतले असून, युरोपमधील वर्तमानपत्रांनीही याविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. शार्कच्या युकृतात (लिव्हर) Squaleneनावाचा घटक असतो. हा घटक म्हणजे एक नैसर्गिक तेल असते. याचा वापर कोरोनावरील लस तयार करण्यासाठी केला जात आहे. जगात सध्याच्या घडीला 30हून अधिक कोरोना लसींवर संशोधन सुरू असून, या लसींची मानवी चाचणीही सुरू आहे. या संदर्भात शार्क अलाइज् या संस्थेने म्हटले आहे की, जगात लस तयार करताना Squalene घटकाची गरज पडली तर, अडीच लाख शार्क मारले जाऊ शकतात. जर, लसीचे दोन डोस देण्यात येणार असतील तर, आणखी अडीच लाख शार्कची हत्या होऊ शकते. बहुतांश लशींचे दोन डोस देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर 5 लाख सागरी जीव नष्ट होणार आहेत. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शार्कचा जीव का धोक्यात?
शार्क अलाइज् संस्थेची संस्थापक स्टीफनी ब्रेन्डिल यांनी म्हटले आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर सागरी जीव मारणे, उचित होणार नाही. मुळात शार्कमध्ये प्रजनन मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे पाच लाख शार्कचा जीव जाणे निश्चित धोक्याचे आहे. शार्क हा सागरी जीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या नसण्याने सागरी जीवन चक्र आम्ही कोरोना लशीच्या विरोधात नाही. तसेच लस निर्मितीची प्रक्रियाही थांबवण्याचा आमचा प्रयत्न नाही. पण, आम्ही शार्कच्या Squaleneशिवाय कोरोना लशीची चाचणी होण्याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे आमचे मत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five lakh sharks may die for Coronavirus vaccine