भीषण! 100 प्रवासी नेणारं विमान कोसळलं; बचावकार्य सुरु

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

अल्माटी विमातळावरील प्रशासनाने बचावकार्य सुर केले असून प्रवाशांसह क्रू मेंबर्सना बाहेर काढण्यात येत आहे. विमान कोसळल्यावर कोणत्याही प्रकारची आग लागली नसल्याचे अल्माटी विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.   

अल्माटी : कझाकिस्तानमध्ये 100 प्रवासी असलेलं विमान कोसळलं आहे. अल्माटी विमातळावरुन उड्डाण करत असताना जवळच असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळलं. यावेळी विमानात 100 प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात आज सकाळी सात वाजून 2 मिनिटांनी झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. 

हे विमान अल्माटीवरुन कझाकिस्तानची राजधानी असलेल्या नूर सुलतान शहराकडे निघाले होते. या अपघातात आतापर्यंत सहा लहान मुलांसह नऊजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

अल्माटी विमातळावरील प्रशासनाने बचावकार्य सुर केले असून प्रवाशांसह क्रू मेंबर्सना बाहेर काढण्यात येत आहे. विमान कोसळल्यावर कोणत्याही प्रकारची आग लागली नसल्याचे अल्माटी विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flight with 100 onboard crashes in Kazakhstan