
लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेकडो गावे पुराखाली गेली असून गेल्या २४ तासांत किमान १७ जणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. सतलज, रावी आणि चिनाब नद्यांमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे या प्रांतातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.