इस्रायलमध्ये 'फ्लोरोना'चा पहिला रुग्ण; वाचा कोरोनाशी निगडीत काय आहे हे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

इस्रायलमध्ये 'फ्लोरोना'चा पहिला रुग्ण; वाचा काय आहे प्रकरण?

इस्रायलमध्ये (Israel) ‘फ्लोरोना’ (flurona) नावाच्या रोगाचे पहिले प्रकरण नोंदवले गेले आहे. 'फ्लोरोना' म्हणजे फ्लू आणि कोरोना विषाणूचा (flu and Covid virus) एकाच वेळी झालेला संसर्ग होय. यूनेटने गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा: गेल्या २४ तासांत राज्यात मोठी रुग्णवाढ; ८ जणांचा कोरोनाने मृत्यू

मध्य इस्रायलमधील पेटॅच टिक्वा येथील बेलिन्सन रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला हे दोन्ही संक्रमण झाल्याचं आढळलं आहे. या महिलेला दुहेरी संसर्ग झाल्याचं आढळलंय. युनेटने सांगितंलय की, या महिलेने दोन्हीपैकी कोणत्याही विषाणूविरूद्ध लढणारी लस घेतलेली नाही. येत्या गुरुवारी तिला रुग्णालयातून सोडण्यात येईल. इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालय (Israeli Health Ministry) अद्याप या प्रकरणाची तपासणी केली आहे. दोन विषाणूंचा एकत्रितपणे संसर्ग झाल्यास अधिक गंभीर आजार निर्माण होऊ शकतो की नाही, याबाबत अद्याप कसलीही स्पष्टता नाहीये.

हेही वाचा: महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

आरोग्य अधिकार्‍यांना असं वाटतं की, इतर रुग्णांना देखील दोन्ही विषाणूंची लागण झाली असावी, परंतु अद्याप निदान झाले नाही. "गेल्या वर्षी आम्हाला हा प्रकार दिसून आला नाही. गर्भवती किंवा प्रसूती महिलांमध्ये फ्लूची अशी प्रकरणे पाहिली नाहीत. प्रो. अर्नॉन विझनिट्सर यांनी याबाबत मत मांडताना म्हटलंय की, आज आम्ही कोरोनाव्हायरस आणि फ्लू या दोन्हीचा संसर्ग एकत्र होण्याचा असा प्रकार पहिल्यांदाच पाहत आहोत. सध्यातरी या महिलेमध्ये कसलीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीयेत.

Web Title: Flurona First Flu And Covid Case Reported Infection Of The Flu And Covid Virus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus
go to top