कॅनडामध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेला बाहेरील व्यक्ती पंतप्रधान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी (Mark Carney) यांची कॅनडाच्या सत्ताधारी लिबरल पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आहे. यासह, ते देशाचे पुढील पंतप्रधान असणार आहेत. कार्नी हे जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांची जागा घेतील, ज्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच पदाचा राजीनामा दिला होता.