
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबींना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. इम्रान खान यांना १४ वर्षांची, तर बुशरा बीबींना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासोबतच, इम्रान खान यांच्यावर १० लाख रुपये आणि बुशरा बीबींवर ५ लाख रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे.