Fox News Settlement : एक चुकीच्या बातमीची किंमत ५८,००० कोटी! न्यूज चॅनलने केलं सेटलमेंट

fox news settles defamation case dominion company for 58000 crores rupees voting machine case rak94
fox news settles defamation case dominion company for 58000 crores rupees voting machine case rak94

अमेरिकेतील न्यूज चॅनल फॉक्स न्यूज ला एक चुकीची बातमी दाखवल्याबद्दल मोठा रक्कम द्यावी लागली आहे. डिममिनियन कंपनीसोबत त्यांचा सुरू असलेला वाद आणि कोर्टातील मानहानीच्या खटला सामंज्यस्याने सोडवण्यात आला . पण या दरम्यान मीडिया कंपनीला तब्बल ७८७ मिलीयन डॉलर म्हणजेच ५८,०५९ कोटी रुपये दंड म्हणून द्यावे लागणार आहेत. (Fox News Settlement)

या प्रकरणानंतर डोमिनियन वोटिंग सिस्टम्स सोबत फॉक्स न्यूजने केलेली ५८,०५९ कोटी रुपयांची सेटलमेट ही अमेरिकन इतिहासात एखाद्या मीडिया कंपनीसंबंधीत सार्वजनिक स्वरुपात झालेली सर्वात मोठी मानहानी सेटलमेंट ठरली आहे. डोमिनियन कंपनीने न्यूज चॅनलवर १.६ अब्ज डॉलरच्या मानहानीची केस केली होती.

डेलावेयर सुपीरयर कोर्टाच ज्यूरीने शपथ घेतल्याचा काही तासानंतर दोन्ही पक्षात सेटलमेंटची घोषणा करण्यात आले. दुपारच्या लंच ब्रेकदरम्यान तब्बल तीन तास न्यायालयाचं कामकाज थांबलेलं होतं. यादरम्यानच दोन्ही पक्षात सेटलमेंट करण्यात आली. यानंतर दोन्ही पक्षांच्या १२ सदस्यांच्या ज्युरीना या सेटलमेंटची माहिती देण्यात आली. यानंतर कोर्टातील केस रद्द करण्यात आली.

fox news settles defamation case dominion company for 58000 crores rupees voting machine case rak94
Maharashtra Bhushan : विलासरावांनी दिलेला महाराष्ट्र भूषण निळू फुलेंनी नम्रतापूर्वक नाकारला होता आणि…

प्रकरण काय आह?

२०२० साली अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीदरम्यान फॉक्स न्यूजने वोटिंग मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर वोटिंग मशीन बनवणाऱ्या डोमिनियन कंपनी ने फॉक्स न्यूजवर १.६ अब्ज डॉलरच्या मानहानीचा दावा ठोकला. दोन वर्ष न्यायालयीन लढ्यानंतर फॉक्स न्यूज विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

चॅनलने आरोप केला होता की राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत डोमिनियन वोटिंग मशीनमध्ये गडबड केली होती. मात्र कोर्टात न्यूज चॅनलचा दावा खोटा असल्याचे आढळून आले. मात्र कोर्टात यावर निर्णय होण्याआधीच सेटलमेंट करण्यात आली.

हेही वाचा - What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

fox news settles defamation case dominion company for 58000 crores rupees voting machine case rak94
Virat Kohli Tweet : रोहित शर्मा खिजगणतीतच नाही! विराटनं धोनीचा फोटो शेअर करत केलं ट्वीट

कोर्ट फायलींगनुसार सांगण्यात आले होते की, ७८७.५ मिलियन डॉलर ही रक्कम जोमिनियन कंपनीने मागितलेल्या १.६ अब्ज डॉलरच्या आर्धी आहे. मात्र ती २०१८ मध्ये कंपनीच्या मुल्यांकनाच्या तब्बल १० पट आहे आणि २०२१ मध्ये वार्षीक उत्पन्नाच्या तब्बल आठ पट आहे. डोमिनियन कंपनीने दावा केला होता की फॉक्स न्यूजने खोटी बातमी दिल्याने कंपनीचे अब्जावधींचे नुकसान झाले आहे.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार दोन्ही पक्षांनी सेटलमेंट केल्यानंतर आता कोर्टात ट्रायल होणार नाहीये. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की या सेटलमेंट कागदपत्रांवर साक्षीदार म्हणून फॉक्स न्यूजतर्फे फॉक्स कॉरपोरेशन चे चेअरमन आणि मीडीया टायकून रुपर्ट मर्डोक आणि त्यांचे सीइओ मुलगा लाचलान मर्डोक आणि फॉक्स न्यूजचे होस्ट सीन हैनिटी आणि टकर कार्लसन यांची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com