ऑफिस ट्रिपदरम्यान सेक्स करताना आला मृत्यू अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

ऑफिसची ट्रिप गेली असताना एक कर्मचारी अनोळखी महिलेसोबत सेक्स करत असताना हृदय बंद पडल्यामुळे त्याचा मृत्यू जागीच झाला.

पॅरिसः ऑफिसची ट्रिप गेली असताना एक कर्मचारी अनोळखी महिलेसोबत सेक्स करत असताना हृदय बंद पडल्यामुळे त्याचा मृत्यू जागीच झाला. न्यायालयाने 'वर्कप्लेस एक्सिडेंट' म्हणून त्याच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एम. जेवियर असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱयाचे नाव असून, तो फ्रान्समधील रेल्वे कंन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये (टीएसओ) काम करत होता. 2013 मध्ये कंपनीने काढलेल्या ट्रिपसोबत जेवियर गेले होते. ट्रिपदरम्यान जेवियर हे अनोळखी महिलेसोबत सेक्स करत असताना त्यांना हृदयविकाराचा मृत्यू आला अन् त्यांचा मृत्यू झाला होता.

जेवियर यांच्या कुटुंबियांनी मदत मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सुनावणीदरम्यान 'वर्कप्लेस एक्सिडेंट' म्हणून त्याच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांचे वकील सारा बल्लुट यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Frenchman who died during sex on a business trip was victim of workplace accident court rules