Bubonic Plague: पुणेकरांना धडकी भरवणारा प्लेग आला परत? जगभरात कोट्यवधी लोकांचा घेतला होता जीव, काय आहेत लक्षणं?

The bubonic plague is back. Should you be worried? अमेरिकेच्या ओरेगॉन शहरात या महामारीचा रुग्ण आढळून आल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. (fresh case of bubonic plague disease)
Bubonic Plague
Bubonic PlagueEsakal

नवी दिल्ली- ब्लॅक डेथ म्हणून कुख्यात असलेल्या बुबोनिक प्लेगची (Old Bubonic Plague Is Back) एका व्यक्तीला लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. ब्लॅक डेथ ही मानवी इतिहासातिल सर्वात घातक महामारी मानली जाते. अमेरिकेच्या ओरेगॉन शहरात या महामारीचा रुग्ण आढळून आल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. (fresh case of bubonic plague disease behind black death pandemics detected recently Oregon US)

७ फेब्रुवारी रोजी ओरोगॉनमधील अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, २०१५ नंतर पहिल्यांदा बुबोनिक प्लेगचा रुग्ण आढळून आला आहे. पाळीव मांजराच्या संपर्कात आल्याने व्यक्तीला या विषाणूची लागण झाली. बुबोनिक प्लेग इतका का घातक समजला जातो? त्याचे कशा पद्धतीने संक्रमण होते हे आपण जाणून घेऊया.

Bubonic Plague
प्लेग रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंचा झाला होता मृत्यू; जाणून घ्या 10 गोष्टी

मांजराचा मृत्यू

ओरिगॉनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीवर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. दुर्दैवाने मांजराचा मृत्यू झाला आहे. शिवाय बाधित व्यक्ती आणि मांजराच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधलं जात असून त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे. शिवाय संपर्कातील व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधी दिली जात आहे.

आरोग्य विभागाने माहिती दिलीये की, याप्रकणी अन्य रुग्ण आढळून आलेले नाहीत. रुग्णाच्या आजाराचे लवकर निदान झाले आणि त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे मोठा धोका टळला आहे. प्लेग हा झूटॉनिक बॅक्टेरियल इंफेक्शन आहे जो बेक्टेरियम येयेरसिन्हा पेस्टिसमुळे होतो. हा विषाणू माणूस आणि प्राण्यांमध्ये संक्रमित होऊ शकतो. सर्वसाधारणपणे उंदिर, मांजरामध्ये हा विषाणू आढळून येतो.

५ कोटी लोकांना मृत्यू

ब्लॅक डेथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुबोनिक प्लेग महामारीमध्ये १३४६ आणि १३५३ मध्ये एकट्या युरोपमध्ये ५ कोटी नागरिकांना मृत्यू झाला होता. या महामारीचे युरोपच्या लोकांवर दुरगामी परिणाम झाले. लोकसंख्या लाभांश गमावणे, आर्थिक फटका आणि समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यास ही महामारी कारणीभूत ठरली. (5 crore people died)

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, संसर्गित प्राण्यांवर जगणारे उंदिर बेक्टेरियम येयेरसिन्हा पेस्टिस विषाणूचे वहन करतात. व्यक्तीला उंदिराने चावल्यामुळे याचा प्रसार होतो. संसर्गित प्राण्याच्या संपर्कात आल्याने देखील याचा प्रसार होतो. दुर्मिळ प्रकरणात संसर्गित व्यक्ती किंवा प्राण्याच्या सानिध्यात श्वास घेतल्याने याचा संसर्ग होतो.

पुण्यात आली होती प्लेगची साथ

१८९६ मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. यामुळे अक्षरश: पुण्यात हाहाकार माजला होता. १८९७ मध्ये पुण्यात संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिशांचे अत्याचार सुरु झाले. प्लेग असण्याच्या शंकेने सुद्धा त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये डांबलं जात होतं. घराघरात जाऊन अशा व्यक्तींचा शोध घेतला जात होता. या कायद्याच्या अमलबजावणीसाठी ब्रिटिश अधिकारी कुख्यात रॅड याची नेमणूक करण्यात आली होती.

Bubonic Plague
Tibet Glacier Virus : तिबेटमधील ग्लेशिअर वितळले अन् बाहेर आले हजारो वर्षांपूर्वीचे विषाणू.. भारताला मोठा धोका?

बुबोनिक प्लेगचे लक्षणं काय आहेत?

- अचानक ताप येणे आणि थंडी वाजणे

-डोकेदुखी आणि अंगदुखी

- मांडी, मान, खांद्यामध्ये दुखणे

- थकवा आणि अशक्तपणा

-मळमळ आणि उलटी

- रक्तामध्ये विष पसरणे त्यामुळे व्यक्ती धक्क्यामध्ये जाण्याची शक्यता

- खोकला, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे

(Symptoms of bubonic plague)

उपचार काय?

streptomycin, gentamicin किंवा doxycycline सारख्या अँटिबॉडी बुबोनिक विषाणूला दूर ठेवण्यासाठी कामाला येतात. विषाणूची लागण झाल्यास रुग्णाने विगलीकरणात राहावे लागते. तसेच रुग्णांची ओळख करुन त्यांच्यावर उपचार करणे महत्त्वाचे असते. तसेच संसर्गित प्राण्यांपासून दूर राहणे, शिवाय पाळीव प्राण्याची योग्य काळजी घेऊन त्यांना संसर्गित होण्यापासून वाचवणे हे उपाय करता येतील (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com