G7 Summit : मोदी-ट्रम्प यांच्यात होणार चर्चा; काश्मीर मुद्द्याकडे लक्ष

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

या संमेलनात मोदींची संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांच्याशी चर्चा झाली. या चर्चात पर्यावरणासह दहशतवाद, व्यापार यांसह विविध विषयांवर चर्चा झाली. मोदी आणि ट्रम्प यांच्यात आज होणाऱ्या बैठकीत काश्मीर मुद्द्यासह जागतिक मंदीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल झाले असून, आज (सोमवार) त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा होणार आहे. या बैठकीत काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या संमेलनात मोदींची संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांच्याशी चर्चा झाली. या चर्चात पर्यावरणासह दहशतवाद, व्यापार यांसह विविध विषयांवर चर्चा झाली. मोदी आणि ट्रम्प यांच्यात आज होणाऱ्या बैठकीत काश्मीर मुद्द्यासह जागतिक मंदीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांची ही पहिलीच भेट आहे. पाकिस्तानने भारताच्या निर्णयाला विरोध करत व्यापार संबंध तोडून टाकले आहे. तर, ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे यापूर्वीही म्हटले आहे. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेत याविषयी काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

त्यापूर्वी, मोदींनी इतर देशांविरोधात दहशतवादाचा राजकीय अस्त्र म्हणून होणारा वापर जगाने नाकारावा, असे आवाहन भारत आणि बहारिन यांनी जागतिक समुदायाला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बहारिनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संयुक्तरीत्या हे आवाहन करण्यात आले. मोदींनी त्यांच्याबरोबर सुरक्षा, सायबर सुरक्षा, दहशतवादविरोधी यंत्रणा, ऊर्जा, व्यापार प्रशिक्षण आणि गोपनीय माहितीची देवाण-घेवाण या मुद्यांवर चर्चा केली. 

बहारिन दौरा आटोपून पंतप्रधान मोदी जी-7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. या परिषदेत मोदी पर्यावरण आणि डिजिटल तंत्रज्ञानाबाबत बोलणे अपेक्षित असून, ते विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करतील. काश्‍मीरचा दर्जा काढून घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर मोदी जागतिक व्यासपीठावर जात असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारत या गटाचा सदस्य नसला तरी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विशेष निमंत्रणावरून मोदी येथे आले आहेत. ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका हे श्रीमंत देश या गटाचे सदस्य आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: G7 summit Donald Trump and Narendra Modi meet today can discuss on Kashmir issue