Gangs Stealing Portable Loos In UK : आता होऊ लागलीय टॉयलेटची चोरी! नेमकं कुठे घडतंय हे प्रकरण

अशी टोळी आहे जी मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत नाही तर टॉयलेट चोरते
Gangs Stealing Portable loos In UK
Gangs Stealing Portable loos In UKesakal

Gangs Stealing Portable loos In UK : जर तुम्हाला सांगितलं की चोरांची एक अशी टोळी आहे जी मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत नाही तर टॉयलेट चोरते आणि तेही वाहनांमधून येऊन, तर यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

मग तुम्ही म्हणाल, टॉयलेट कोण चोरतं भाऊ? पण सध्या ब्रिटनमध्ये चोरीची अशीच एक विचित्र घटना चर्चेत आहे. त्यामुळे चोरटे इतर गोष्टींना कंटाळले असल्याचे दिसून येत आहे. आता त्यांनी टॉयलेट चोरण्यास सुरुवात केली आहे. ही विचित्र चोरी कशासाठी होते आहे ते जाणून घेऊया.

Gangs Stealing Portable loos In UK
Health Tips :  पोटात गॅस झाला की कळायचंच बंद होतं, लगेचच करा हे उपाय,फरक पडेल

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये चोरांची एक टोळी माफिया स्टाईलमध्ये विचित्र चोरी करत आहे. ही टोळी ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या पोर्टेबल टॉयलेटची लूट करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे चोर फक्त टॉयलेटच का लुटत आहेत. अहवालानुसार, प्रत्यक्षात येथे पोर्टेबल टॉयलेटची कमतरता आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी संघटित पद्धतीने अशी चोरी सुरू केली आहे

Gangs Stealing Portable loos In UK
Child Mental Health : सोशल मीडियावर तुमची मुलं किती वेळ घालवताय? 76% टक्के मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

चोर वाहनांतून येतात

चोरांची टोळी वाहनांमध्ये येते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यानंतर संपूर्ण पोर्टेबल टॉयलेट उचलून हलवता येते. अहवालात असे दिसून आले आहे की एका महिन्याच्या आत, सुमारे 40 पोर्टेबल शौचालये गायब झाली आहेत. त्यांची किंमत 40 लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मोटार स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये ही फिरती स्वच्छतागृहे बसवण्यात आली.

Gangs Stealing Portable loos In UK
Health : आंबवलेल्या पदार्थांचे फायदे

पोलिसांनी केलंय आवाहन

थ्री कंट्रीज टॉयलेट हायरचे नील ग्रिफिन म्हणतात की चोरीला गेलेले मोबाइल टॉयलेट्स पुनर्प्राप्त करणे कठीण आहे कारण तुम्ही ते तुमचेच आहेत म्हणून दावा करू शकत नाही. पोलिसांना दररोज वेगवेगळ्या ठिकाणाहून अशा चोरीच्या बातम्या येत आहेत. अशा स्थितीत पोलिसांनी आता शौचालय मालकांना त्याच्यावर खुणा करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून चोरीला गेलेले पोर्टेबल टॉयलेट ओळखता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com