Turkey : 40 लाख लोकांचा मारेकरी असलेल्या चंगेज खानच्या नातवाचा 'महाल' तुर्कस्तानमध्ये सापडला. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Turkey Genghis Khan's

Turkey : 40 लाख लोकांचा मारेकरी असलेल्या चंगेज खानच्या नातवाचा 'महाल' तुर्कस्तानमध्ये सापडला.

तुर्कस्तानमध्ये अंकारा येथे पुरातत्वशास्त्रज्ञांनी एका राजवाड्याचा शोध लावला आहे. हा सापडलेला राजवाडा चंगेज खानचा नातू हुलाकू खान याचा असावा, असे पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे.

हलाकू खानने एकेकाळी इराण, इराक आणि तुर्कस्तानचा ताबा घेतला होता. हुलाकू खानचे आजोबा चंगेज खान यांनी जगभरात असंख्य लढाया केल्या, ज्या लढाया मध्ये सुमारे 40 लाख लोक हे मृत्यू पावले.

जगातील सर्वात क्रूर राज्यकर्त्यांबद्दल बोलायचे झाले तर चंगेज खानचे नाव सर्वात आधी घेतले जाते. असे म्हणतात की चंगेज खानचे सैन्य जिथून जात असे, तिथल्या माणसांचा नायनाट करुनच ते पुढे जात असे.

चंगेज हा निर्दयी सेनानी होताच, पण त्याचा इतकाच त्याचा नातू असलेला हुलागु खान हा देखील एक धोकादायक सेनापती होता.

आताच काही दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये चंगेज खानच्या नातवाशी संबंधित एक वास्तू सापडली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणतात की , त्यांना तुर्कीमध्ये एक भव्य राजवाडा सापडला आहे, तो कदाचित हलकू खानचा असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: हुकूमशाही नि धर्मवादाच्या पकडीत तुर्कस्तान

हलकू खान 1217 ते 1265 पर्यंत आयुष्य जगला आहे.असं म्हणतात की त्याने जवळजवळ नैऋत्य आशियाचा बराचसा भाग हा युध्द करुन आपल्या ताब्यात घेतला होता. पुढे त्याने 1258 मध्ये बगदाद देखील काबीज केले, जे शहर त्यावेळी इस्लामची सांस्कृतिक आणि धार्मिक राजधानी होती. त्याच्या या आक्रमणामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक शहर असलेल्या बगदादचा बराचसा भाग हा नष्ट झाला होता. हलाकू खानचे वडील चंगेज खानचे चौथे पुत्र होते. त्याने मंगोल साम्राज्याचा प्रसार मध्य पूर्व आणि आशियामध्ये केला.

चंगेज खानने चाळीस लाख लोक मारले...

एका अंदाजानुसार, चंगेज खानने त्याच्या युद्ध मोहिमेदरम्यान सुमारे 40 लाख लोक मारले होते असे सांगितले जाते. त्यावेळच्या लोकसंख्येनुसार ते जगाच्या लोकसंख्येच्या १० टक्के लोक चंगेज खानने मारुन टाकले होते. पुढे मग चंगेज खानच्या मृत्यूनंतर, मंगोल साम्राज्य लहान राज्यांमध्ये विभागले गेले. यापैकी एक इल-खानाते होता ज्याचा प्रमुख हलकू खान होता. त्याने सध्याचे इराण, इराक आणि तुर्कस्तान व्यापले.

हेही वाचा: World Chess Day 2022 : भारतातील गुप्त राजवट अन् बुद्धीबळ इतिहास

स्वस्तिक चिन्ह देखील सापडले.

काही इतिहासकारांनी हलाकू खानच्या उन्हाळी राजधानीचा उल्लेख केला आहे, पण ती कुठे होती हे माहीत नाही. पुरातत्वशास्त्रज्ञांना आता विश्वास आहे की त्यांनी पूर्व तुर्कीच्या व्हॅन राज्यात ही जागा शोधली आहे. या जागेचे उत्खनन करणाऱ्या पथकाने सांगितले की, मोठ्या प्रमाणात लूटमार झाल्यानंतर राजवाड्याचे नुकसान झाले आहे. उत्खननादरम्यान त्यांना राजवाड्याच्या अवशेषांमधून चकचकीत छतावरील फरशा, पोर्सिलेन आणि मातीची भांडी देखील सापडली आहेत.

मंगोलियन अकादमी ऑफ सायन्सेसचे मुंखतुल्गा रिंचिनखोरोल यांनी सांगितले की त्यांना येथे मंगोल काळापासूनचे स्वस्तिक, शक्तीचे प्रतीक सापडले. खानच्या या राजवाड्याचे अवशेष आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे शास्रज्ञांनी सांगितले.

Web Title: Genghis Khans Grandsons Palace Found In Turkey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TurkeyArcheologyHistory