Viral Video: संसद आहे की कुस्तीचा आखाडा? खासदाराने सत्ताधारी नेत्याला लगावले ठोसे; जाणून घ्या कारण

Georgian Parliament brawl : जॉर्जियाच्या संसदेत सत्ताधारी पक्षाचे प्रमुख बोलत होते. यावेळी एका खासदाने त्यांच्यावर हल्ला केला आहे.
Georgian Parliament
Georgian Parliament

Georgia: जॉर्जियाच्या संसदेमध्ये अक्षरश: राडा पाहायला मिळाला आहे. सोमवारी जॉर्जियाच्या संसदेत सत्ताधारी पक्षाचे प्रमुख बोलत होते. यावेळी एका खासदाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. संसदेमध्ये फॉरेन एजेन्ट नावाचे एक विधेयक आणले जात होते. हे विधेयक वादग्रस्त ठरले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. (Georgian Parliament brawl Opposition MP throws punches at ruling party leader)

फॉरेन्स एजेन्ट विधेयकावर देशातूनही रोष पाहायला मिळत आहे. अनेकांनी देशात विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. विशेषत: पश्चिमी देशांनी देखील या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. त्यातच संसदेमध्ये हाणामारी पाहायला मिळाली. काहीकाळ संसदेमध्ये गोंधळ सुरु होता. अचानक हल्ला झाल्याने संसदेत उपस्थित खासदारांना धक्का बसला होता.

Georgian Parliament
Viral Video: मेट्रोमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत महिलेला स्पर्श करत होता? प्रवाशाने कॅमेऱ्यामध्ये कैद केलं अन्...

सीएएन या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी जॉर्जियन ड्रिम पक्षाचे नेते मामुका Mamuka Mdinaradze यांच्यावर हा हल्ला झाला आहे. फॉरेन एजेन्ट विधेयक आणण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांना विरोधी खासदार अलेको इलीसाशिवीली Aleko Elisashvili यांनी ठोसा लगावला आहे.

खासदाराने ठोसा लगावल्यानंतर संसदेत गोंधळ सुरु झाला. अलेको यांना देखील मारहाण करण्यात आल्याचं समजतंय. दुसरीकडे संसदेच्या इमारतीबाहेर आंदोलन करणाऱ्या लोकांनी खासदार अलेको यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. त्यांच्या नावाने संसदेबाहेर घोषणा देण्यात आल्या.

Georgian Parliament
Viral Video: बेरोजगारी रोखण्यासाठी मोदी-योगींनी एकही मुल...; खासदाराचा व्हिडिओ डीपफेक असल्याचा भाजपचा दावा

नवा कायदा काय आहे?

सत्ताधारी जॉर्जियन ड्रीम पार्टीने मागील महिन्यात जाहीर केलं होतं की ते नवीन कायदा आणणार आहे. या कायद्याअंतर्गत ज्या संस्था परदेशातून निधी मिळवतात त्यांची फॉरेन एजेन्ट म्हणून नोंद करण्यात येईल. शिवाय त्यांना मोठा दंड आकारण्यात येईल.

विशेष म्हणजे याआधीही हा कायदा देशात आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण, मोठ्या विरोधामुळे तो बासणात गुंडाळण्यात आला होता. दरम्यान, जॉर्जिया हा रशियाच्या सीमेला लागू असलेला देश आहे. सध्याचे सत्ताधारी रशियाच्या मर्जीतील असल्याचं बोललं जातं. नव्या कायद्यामुळे जॉर्जियाचे यूरोपीयन युनियन आणि अमेरिकेसोबतचे संबंध बिघडले आहेत. (Viral Video)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com