दुबईत जगातील सर्वांत उंच हॉटेल

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

दुबई जगभरातील लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या देशाने पैसे आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जगातील सर्वात उंच इमारतीनंतर आता उंच हॉटेलचा विक्रमही आपल्या नावे आहे. या आधिचा हा विक्रम दुबईमधीलच जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस हॉटेलच्या नावे होता. हा विक्रम मोडत दुबईत सर्वात मोठ्या हॉटेल गेवोराचा उद्धाटन सोहळा आज पार पडणार आहे.

सोन्याचा मुलामा दिलेली ही 75 मजली इमारत आहे. हॉटेल गेवोरा हे आता दुबईतलेच नाही तर जगातील सर्वाधिक उंचीचे हॉटेल ठरले आहे. 

यापूर्वी जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस या हॉटेलच्या नावावर हा विक्रम होता. हॉटेल गेवोरा हे जेडब्ल्यू मॅरिएट मार्किसपेक्षा केवळ एक मीटरने उंच आहे. हॉटेल गेवोरामध्ये 500 पेक्षा अधिक रुम्स आहेत तर आश्चर्याची बाब म्हणजे जेडब्ल्यू मॅरिएट मार्किसमध्ये 1600 पेक्षा जास्त रुम्स आहेत. 

Web Title: Gevora, the world’s tallest hotel, opens in Dubai

टॅग्स