Video: दोन सावल्या दिसल्या आणि बोबडीच वळली...

वृत्तसंस्था
Friday, 18 September 2020

जगात भूत आहे की नाही याबाबत माहिती नाही. पण, अनेक कथा, दंतकथा आपल्याला ऐकायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपले मत नोंदवताना दिसत आहेत.

वॉशिंग्टन : जगात भूत आहे की नाही याबाबत माहिती नाही. पण, अनेक कथा, दंतकथा आपल्याला ऐकायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपले मत नोंदवताना दिसत आहेत.

भूत व्यायाम करतं? व्हिडिओ व्हायरल...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पर्यटकांना रात्रीच्या प्रवासादरम्यान दोन सावल्या मोटारीसमोरून जाताना दिसल्या. फक्त सावल्याच दिसल्यानंतर बोबडी वळाली. ही माणसं तर नक्कीच नव्हती मग सावली कसली असा प्रश्न आम्हाला पडला. काही क्षण गोंधळून गेलो. पण, धाडस करून पुढे गेलो. मोटारीतील कॅमेऱयाने सिव्हील वॉर साइटजवळ हे क्षण टिपले आहेत, असे पर्यटकांनी सांगितले. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा नक्की काय प्रकार आहे यावर नेटिझन्स चर्चा करू लागले आहेत. गेटिसबर्गचा इतिहास आणि तेथील रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक पर्यटक येऊ लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghosts of gettysburg caught on camera video viral