
लंडन : पाकव्याप्त काश्मीरचा भाग असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानपुढे असलेल्या पर्यावरणीय व राजकीय आव्हानांबाबत पाकव्याप्त काश्मीरचे राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद आयुब मिर्झा यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या ‘रेडिओ हिमालय न्यूज’ च्या नव्या भागामध्ये या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. या प्रदेशाचा भारतात समावेश करण्याचेही त्यांनी जोरदार समर्थन केले.