सीआयएच्या संचालकपदी जीना हास्पेल यांची नियुक्ती

पीटीआय
शनिवार, 19 मे 2018

वॉशिंग्टन : अमेरिकेतील गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकपदी प्रथमच जीना हास्पेल या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही हास्पेल यांची निवड करण्यात आली आहे. 

9/11च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर कैद्यांच्या चौकशीसाठी सीआयएकडून वॉटरबोर्डिंगसारख्या अतिशय क्रूर पद्धती वापरण्यात आल्या होत्या, त्यातील सहभागामुळे हास्पेल या वादग्रस्त ठरला आहेत. सीआयएच्या संचालकपदावर हास्पेल यांच्या नियुक्तीवर सिनेटने गुरुवारी 54 विरुद्ध 45 मतांनी शिक्कामोर्तब केले.

मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसद सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. मात्र, मतदानावेळी सहा डेमोक्रॅटिक सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिला. हास्पेल यांच्या नियुक्तीनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे ट्विटरवर अभिनंदन केले आहे. सीआयएच्या 70 वर्षांच्या इतिहासात संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती होणाऱ्या हास्पेल या पहिल्याच महिला आहेत. 

वादग्रस्त व्यक्तिमत्त्व 

- हास्पेल सध्या सीआयएच्या उपप्रमुख होत्या 
- चौकशीदरम्यान कैद्यांच्या अमानवी छळ केल्याचा आरोप 
- कैद्यांना लष्करी कायद्यानुसार वागविण्याचे दिले आश्वासन 
- जगभरात सीआयएसाठी विविध भूमिकांमध्ये काम केले 
- 1980 मध्ये आफ्रिकेत मदर तेरेसा यांच्या सामाजिक कार्यात सहकार्य 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gina Hospel appointed as CIAs director